ETV Bharat / city

मुंबई महापालिकेची खबरदारी! एका कोरोना रूग्णामागे आता ३२ जणांची होणार चाचणी - Mumbai Corona News

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका सज्ज झाली आहे. नवीन आढळणाऱ्या कोरोना रुग्णांकडे गांभीर्याने लक्ष्य दिले जात आहे. आतापर्यंत एका रुग्णामागे २० जणांची कोरोना चाचणी केली जात होती. आता ३२ जणांची चाचणी करण्याचे आदेश, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कोरोना चाचणीचा फाईल फोटो
कोरोना चाचणीचा फाईल फोटो
author img

By

Published : Jul 5, 2021, 8:10 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिका सज्ज झाली आहे. मुंबईतील धोकादायक विभागात खबरदारी घेतली जात आहे. नवीन आढळणाऱ्या रुग्णांकडे गांभीर्याने लक्ष्य दिले जात आहे. प्रत्येक धोकादायक प्रभागातील एका रुग्णाच्या मागे याआधी २० जणांची कोरोना चाचणी केली जात होती. आता ३२ जणांची चाचणी करण्याचे आदेश आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पालिकेचा कृती आराखडा

मागील काही दिवसांपासून मुंबईतील काही वॉर्डांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण वाढले आहेत. याची गंभीरपणे दखल घेत महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत ठरवलेल्या वॉर्डात वैद्यकीय अधिकाऱ्यांना एका पॉझिटिव्ह रूग्णाच्या मागे ३२ जणांची चाचणी करावी लागेल. या व्यतिरिक्त, पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात येणार्‍या लोकांचे १०० टक्के संपर्क ट्रेसिंग ७२ तासांत पूर्ण करावे लागेल. संपर्क ट्रेसिंगमध्ये आढळलेल्यांपैकी अती जोखीम प्रकारात सापडलेल्या व्यक्तींची कोरोना तपासणी ५ दिवस किंवा त्यांच्यात काही लक्षणे आढळली तर १४ दिवसांच्या आत करावी लागणार आहे.

कोरोना तपासणी करण्याच्या सूचना

ज्या भागात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत, तेथे आरोग्य पथकामार्फत चाचणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. तसेच, चाचणीद्वारे मिळालेल्या नव्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांना पाठवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दवाखान्यात येणाऱ्या लोकांना अतिसार, उलट्या, डोकेदुखी, घशात खवखव, ताप अशा तक्रारी असल्यास प्रभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना अशा लोकांची कोरोना तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या विभागात रुग्णसंख्येत वाढ

अंधेरी पश्चिम, गोरेगांव, माटुंगा, भांडुप, दहिसर ग्रँट रोड, बांद्रा, बोरिवली आदी विभागांत रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. दरम्यान, काही हायरिस्क कॉन्टॅक्टचा शोध लावण्यात आला आहे. ३ जुलैच्या आकडेवारीनुसार मुंबईत गेल्या २४ तासांत ८ हजार ९३ कॉन्टॅक्टचा शोध घेण्यात आला आहे. त्यामध्ये ५ हजार ७४० हायरिस्क कॉन्टॅक्ट होते. तर, २ हजार ३५३ लो रिस्क कॉन्टॅक्ट होते. आतापर्यंत ७८ लाख ३९ हजार ७० कॉन्टॅक्टचा शोध घेण्यात आला. त्यात ४३ लाख ५१ हजार ३२६ हायरिस्क कॉन्टॅक्ट आहेत, तर ३४ लाख ८७ हजार ७४४ लो रिस्क कॉन्टॅक्ट आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.