ETV Bharat / city

धरणांजवळील रस्ते, पुलांची दुरुस्ती, पुनर्बांधणीसाठी मुंबई महापालिका करणार ५ कोटींचा खर्च

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांलगतच्या सर्व्हिस रोडच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मुंबई महानगर पालिका पाच कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच काही ठिकाणी पुलांची पुनर्बांधणीही केली जाणार आहे.

Mumbai BMC
पालिका करणार ५ कोटीचा खर्च
author img

By

Published : Feb 1, 2022, 4:18 PM IST

मुंबई - तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा आदी धरणांपासून ( Tansa, Vaitarna, Upper Vaitarna, Bhatsa dams ) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्यांच्या बाजूला देखभाल व दुरुस्तीसाठी रस्ते बांधण्यात आले आहेत. त्यापैकी काही रस्ते खड्डेमय झाले आहेत. या मार्गावरील पुलांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्यापैकी रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी ३२ लाख रुपये तर ६० वर्षे जुन्या पुलांच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे २ कोटी असे एकूण ५ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

पुलाच्या दुरुस्तीसाठी २ कोटींचा खर्च -
मुंबई पालिकेकडून ( Mumbai Municipal Corporation ) शहरातील पाणीपुरवठ्यासाठी ठाणे जिल्ह्यात धरणे बांधण्यात आली आहेत. तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा धरणातून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी मोडकसागर, तानसा धरणातून विविध जलवाहिन्यांचे जाळे पसरविण्यात आले आहे. पालिकेच्या नगरबाह्य विभागाकडून देखभाल केल्या जाणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांची लांबी ३५० किमीपेक्षा जास्त आहे. त्याठिकाणी आपत्कालीन कामांसाठी जलवाहिन्यांच्या बाजूने १०० किमी लांबीचे सेवा रस्ते बांधले आहेत. मुंबई पालिकेच्या अखत्यारीत हे सर्व रस्ते आहेत. तानसा, वैतरणा धरणाकडे जाण्यासाठी आटगाव-अघई हा एकमेव रस्ता आहे. याची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाची असली तरीही त्याची देखभाल पालिकेकडून केली जाते. त्या ठिकाणी असलेल्या पुलाचा वापर स्थानिकांकडून केला जात असल्याने या पुलाच्या दुरुस्तीचे काम पालिका हाती घेणार आहे. या कामासाठी पालिकेने २ कोटी ९ लाख रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित धरला होता. मात्र, त्यासाठी चारही कंत्राटदारांनी उणे दराने निविदा सादर केल्या. त्यातील उणे २६.५३ टक्के दराच्या निविदेस प्रशासनाने पसंती दिली आहे. त्यानुसार, या पुलासाठी सर्व कर, आकार धरून २ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.

रस्त्यांच्या कामांसाठी ३ कोटींचा खर्च -
जलवाहिन्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या काही सेवा रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यात माजिवडे ते येवई हा २० किलो मीटरचा आणि येवई ते अघई हा सुमारे ३२ किलोमीटर रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. त्यामुळे, वाहतुकीसह जलवाहिन्यांच्या देखभालीमध्ये अडचणी येत आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पालिकेकडून केले जाणार आहे. त्यासाठी ३ कोटी ३२ लाख रुपये खर्च येणार आहे. या कामासाठी पालिकेने ४ कोटी २४ लाख रुपयांचा अंदाजित खर्च मांडला होता. त्यासाठी कंत्राटदारांनी उणे दराने निविदा सादर केल्या आहेत. त्यातील उणे २४.५१ टक्के दराच्या निविदेस प्रशासनाने पसंती दिली आहे. त्यानुसार, रस्ते दुरुस्तीसाठी सर्व कर, आकार धरुन ती रक्कम ३ कोटी ३२ लाखांवर जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.