ETV Bharat / city

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज - विसर्जनासाठी १६८ कृत्रिम तलाव

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करण्याला विरोध होता. यावर पालिका आणि गणेशोत्सव समन्वय समिती यांच्यात बैठक झाली.

गणेशोत्सव
गणेशोत्सव
author img

By

Published : Sep 2, 2021, 4:58 PM IST

Updated : Sep 2, 2021, 5:09 PM IST

मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र मागील वर्षीपासून कोरोनाचा प्रसार सुरु झाल्याने या सणावर काही प्रमाणात निर्बंध आले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही हा सण साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने केले आहे. त्यानुसार हा सण कोरोना नियमांचे पालन करून साजरा केला जावा यासाठी पालिकेने आपली तयारी सुरु केली आहे.

माहिता देतांना महापालिका उपायुक्त

मुंबईत गणेशोत्सव

मुंबईमध्ये सुमारे २ लाखाहून अधिक घरगुती मूर्ती बसवल्या जातात. मुंबईमध्ये १० हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. मुंबईत दीड, पाच, सात आणि अकरा दिवसाचे गणपती बसवले जातात. यासाठी मुंबई महापालिकेकडून गणेश आगमनापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तसेच नैसर्गिक विसर्जनस्थळी सुविधा उपलब्ध करून देणे, गणेश भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आदी कामे महापालिकेकडून केली जातात. त्यासाठी पालिकेने तयारी सुरु केली आहे.

विसर्जनासाठी १६८ कृत्रिम तलाव

मागील वर्षी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार असल्याने पालिकेने नैसर्गिक विसर्जनस्थळी मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालून कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. त्याला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता. यंदाही मुंबईकरांनी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टेसिंगचे नियम पाळता यावेत म्हणून पालिकेने १६८ ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली आहे.

सार्वजनिक मंडळासाठी हे नियम

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करण्याला विरोध होता. यावर पालिका आणि गणेशोत्सव समन्वय समिती यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक न काढता मंडपात आरती करून १० कार्यकर्त्यांनी मूर्ती विसर्जन स्थळी आणून पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात द्यावी. ती मूर्ती पालिका कर्मचारी नैसर्गिक स्थळी विसर्जन करतील, असा निर्णय घेण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले.

२ आणि ४ फुटांची मूर्ती

मागील वर्षीप्रमाणे यंदाही घरगुती मूर्ती २ फुटांची तर सार्वजनिक मंडळाची मूर्ती ४ फुटांची असेल. काही मंडळांनी मूर्ती आणि सजावट यांची उंची चार फुटांच्या वर असावी, अशी मागणी केली होती. मात्र मूर्ती आणि सजावट यांची उंची ४ फुटांच्या वर जाणार नाही या नियमांचे पालन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी करावे, अशी सूचना काळे यांनी केली आहे.

ऑनलाइन दर्शन

कोरोनच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. ऑफलाइन दर्शनाच्या परवानगीबाबत स्थानिक पोलीस ठाणे आणि राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. त्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

९ सप्टेंबर पूर्वी खड्डे बुजवणार

दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात. गणेश आगमन आणि विसर्जनादरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भक्तांना अडचणीला सामोरे जावे लागते. तसेच मूर्तीला धोका पोहचण्याची शक्यता असते. यासाठी दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवले जातात. यावर्षी पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना ९ सप्टेंबरपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील, असे काळे यांनी सांगितले.

'या' पुलांवर काळजी घ्या'

कोरोना काळामुळे सलग दुसर्‍या वर्षी गणपतीच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीवर बंदी असली तरी लालबाग-परळ अशा दक्षिण मध्य भागातून निघणार्‍या सार्वजनिक गणपतींच्या आगमन-विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. यामध्ये पुलावर गर्दी करू नये आणि एका वेळी भाविकांचे व वाहनांचा मिळून १६ टनांपेक्षा जादा भार पडणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

मध्य रेल्वेवरील धोकादायक पूल -

घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रीज
करीरोड रेल्वे ओव्हर ब्रीज
आर्थर रोड-चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रीज
भायखळा रेल्वे ओव्हर ब्रीज

पश्चिम रेल्वेवरील धोकादायक पूल -

मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज
सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज
केनडी रेल ओव्हर ब्रीज
फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज
बेलासीस मुंबई सेंट्रल जवळील ब्रीज
महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज
प्रभादेवी-कॅरोल रेल ओव्हर ब्रीज
दादर-टिळक रेल ओव्हर ब्रीज
अंधेरी स्टेशनजवळील गोखले रेल्वे ब्रीज

हेही वाचा - शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाग्यश्री बानायत-धिवरे यांची नियुक्ती

Last Updated : Sep 2, 2021, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.