ETV Bharat / city

नाराजी कायम; कोविडसाठी काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजारांची वाढ

author img

By

Published : May 23, 2020, 8:32 PM IST

कोविडसाठी काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात महापालिकेने 10 हजारांची वाढ केली आहे. या निर्णयामुळे निवासी डॉक्टरांमध्ये मात्र नाराजी आहे. निवासी डॉक्टरांना कायमस्वरुपी 20 ते 25 हजार रुपये वाढ देण्याची मागणी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी केली होती.

dct
संग्रहित छायाचित्र

मुंबई - महापालिकेने अखेर पालिका रुग्णालयात कोविडसाठी काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजारांची वाढ केली आहे. या निर्णयामुळे निवासी डॉक्टरांमध्ये मात्र नाराजी आहे. राज्यभरातील सर्व निवासी डॉक्टरांना कायमस्वरुपी 20 ते 25 हजार रुपये वाढ देण्याची मागणी डॉक्टरांनी केली होती. पण फक्त पालिका रुग्णालयात कोविडसाठी काम करणाऱ्यांना वाढ दिली आणि तीही 10 हजाराचीच म्हणत यावर निवासी डॉक्टरांनी नाराजी दर्शवली आहे.

निवासी डॉक्टरांना 2015 पासून 54 हजार रुपये स्टायपेंड मिळतो. तेव्हापासून यात वाढ झालेली नाही. यात वाढ करण्याचे राज्य सरकारकडून वारंवार जाहीर केले जात आहे. पण ही वाढ काही झालेली नाही. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी 15 दिवसापूर्वी सर्व निवासी डॉक्टरांना 20 ते 25 हजार विद्यावेतनात वाढ देण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार आज महापालिकेने कोविडसाठी काम करणाऱ्या महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना 10 हजार रुपये वाढ दिली आहे.

यासंबंधीचे पत्रही आज जारी करण्यात आले आहे. तर ही वाढ केवळ कोविडच्या काळापुरतीच असणार आहे. निवासी डॉक्टरांसह पालिकेतील सर्व इंटर्न डॉक्टरांना 5 हजाराची वाढ देण्याचेही पत्र जारी करण्यात आले आहे. तर पालिका रुग्णालयात कोविडसाठी काम करणाऱ्यांना अतिरिक्त 39 हजार रुपये मिळणार आहेत. या निर्णयामुळे इंटर्न डॉक्टर खूश आहेत. पण निवासी डॉक्टरांमध्ये मात्र नाराजी आहे. फक्त महापालिका रुग्णालयात कोविडसाठी काम करणाऱ्यांना केवळ 10 हजार रुपये वाढ देण्यात आल्याने ही नाराजी आहे. सरसकट निवासी डॉक्टरांना 20 ते 25 हजाराची कायमस्वरूपी वाढ द्यावी, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी उचलून धरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.