ETV Bharat / city

मुंबई : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गांवर रविवारी 7 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलंड रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाऊन जलद मार्गांवर आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

author img

By

Published : Feb 5, 2021, 9:37 PM IST

रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गांवर रविवारी 7 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलंड रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाऊन जलद मार्गांवर आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर वसई ते भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाउन जलद मार्गांवर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.

माटुंगा-मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान सीएसएमटी येथून सुटणार्‍या डाऊन जलद रेल्वे माटुंगा येथे डाऊन धीम्यामार्गावर वळवण्यात येतील. या सर्व लोकल सायन व मुलुंड दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा आपल्या गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिरा पोहोचणार आहेत. ठाण्यापलीकडील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. तर ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड ते दादर स्थानकांदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील आणि आपल्या नियोजित वेळेपेक्षा गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर मार्गावरील सर्व सेवा रद्द

हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल, बेलापूरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी 10.03 ते दुपारी 4.16 दरम्यान पनवेल, बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

हार्बर मार्गावर विशेष गाड्या-

मेगाब्लॉकदरम्यान सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 या वेळेत पनवेलहून ठाणेकडे जाणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील अप सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेल, बेलापूरसाठी जाणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी विभागात विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणांच्या दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरच्या देखभालीसाठी रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक रविवारी मध्य रात्री 12.30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक कालावधीत अप-डाऊन जलद मार्गावरील काही लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. मात्र रविवारी दिवसभर पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनासाठी कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.