ETV Bharat / city

lalbaug gold and silver auction लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून ६० किलो चांदी आणि ५ किलो सोने, 'या' आहेत लिलावात वस्तू - लालबाग राजाच्या सोने चांदीच्या वस्तूंचा लिलाव

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या - चांदीच्या वस्तूंचा लिलाव आता सुरु झाला आहे. लालबागच्या राजाच्या दानपेटीत दहा दिवसात पाच कोटींचे दान जमा झाले असून एका भाविकाने हिरो होंडाची बाईक देखील दान केली आहे.

lalbaug gold and silver auction
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण झालेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव सुरु
author img

By

Published : Sep 15, 2022, 6:32 PM IST

Updated : Sep 15, 2022, 8:33 PM IST

मुंबई मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या - चांदीच्या वस्तूंचा लिलाव आता सुरु झाला आहे. लालबागच्या राजाच्या दानपेटीत दहा दिवसात पाच कोटींचे दान जमा झाले असून एका भाविकाने हिरो होंडाची बाईक देखील दान केली आहे. लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा लिलावास सुरुवात झाली असून हा लिलाव रात्री १० वाजेपर्यंत सुरु असणार आहे. अनेक भाविक या लिलावास हजेरी लावतात आणि बोली लावून वस्तू विकत घेतात.

लालबागच्या राजा विषयी देशात आणि राज्यात एक वेगळे वैशिष्ट्य आहे. हजारो भाविक मोलाच्या लाख मोलाच्या किमतीचे दागिने जडजबाईर आणि मुर्त्या भेट देतात. आणि त्याच दागिन्यांचा आज लालबाग राजाच्या गणपतीच्या स्थळी लिलाव सुरू आहे आणि या लिलावामध्ये जवळजवळ 60 किलो चांदी आणि पाच किलो सोनं शिवाय पाच कोटीपेक्षा अधिक रोकड रक्कम या दानामध्ये प्राप्त झालेली आहे.नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने लालबागचा राजाला दरवर्षी मौल्यवान वस्तू अर्पण केल्या जातात. यंदाही लालबागचा राजाच्या चरणी अनेक वस्तू अर्पण झाल्या असून त्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे.

चरणी अर्पण झालेल्या लालबागच्या राजाच्यासोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव

यंदा लिलाव होणाऱ्या वस्तू (Items to be auctioned this year) यंदा 14 किलो 433 ग्रॅम चांदी आणि 3 किलो 673 ग्रॅम सोन्याच्या वस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये मोदक, हार, फूल, मूर्ती, गदा, चैन अशा सोन्या-चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. यातील आकर्षण म्हणजे एक किलोपेक्षा जास्त वजनाची लालबागचा राजाची मूर्ती, ज्यावर हिरा लावलेला आहे. या मूर्तीची किंमत एक लाखापेक्षा जास्त आहे. शिवाय एक किलो वजनाचं सोन्याचं चॉकलेट आणि एका सोन्याच्या बिस्किटाचाही लिलाव केला जाणार आहे. यंदा लालगाबचा राजाच्या चरणी एकूण साडेपाच किलोपेक्षा जास्त सोनं आणि 75 किलोपेक्षा जास्त चांदी अर्पण झाली आहे. यासंदर्भात लालबाग राजाच्या गणेश मंडळाचे सचिव सुधीर दळवी यांनी एकूण याची तपशीलवार माहिती दिली.

लिलावात समाविष्ट वस्तू

  1. नेकलेस 10 ग्राम 200 मिली- 77 हजार
  2. चंडीचा करंडक -50 हजार आशुतोष
  3. 60 किलो चांदी
  4. सोनं 5 किलो 446 ग्राम
  5. कॅश 5 कोटी पेक्षा
  6. अंगठी 77 हजार
  7. चांदीचा पाळणा 10 ग्राम

Last Updated : Sep 15, 2022, 8:33 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.