ETV Bharat / city

Varavara Rao Bail Rejected : वरवरा रावांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

author img

By

Published : Apr 13, 2022, 7:15 PM IST

एल्गार परिषदेतील आरोपी आणि नक्षलावादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले तेलुगू कवी वरवरा राव ( Activist Varavara Rao ) यांना मोठा झटका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वरवरा राव यांचा जामीन अर्ज फेटाळला ( High Court Bail Rejected Varavara Rao ) आहे.

mumbai high court rejected bail application of varavara rao

मुंबई - एल्गार परिषदेतील आरोपी आणि नक्षलावादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले तेलुगू कवी वरवरा राव ( Activist Varavara Rao ) यांना मोठा झटका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वरवरा राव यांचा जामीन अर्ज फेटाळला ( High Court Bail Rejected Varavara Rao ) आहे.

वैद्यकीय उपचारासाठी यापूर्वी जामीन - मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) यापूर्वी वरवरा राव यांनी 6 महिन्यांसाठी जामीन दिला होता. वैद्यकीय उपचारासाठी हा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्याकाळात राव यांनी अन्य आरोपींच्या संपर्कात राहून नये. साक्षीदारांवर दबाव आणू नये, अशा सूचना न्यायालयाने दिल्या होत्या.

नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परिषदेला... - नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परिषदेच्या माध्यमाथून कोरोगाव भीमा येथील हिंसाचारास कारणीभूत ठरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नक्षल संबंधांवरुन 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी देशभरातील विविध ठिकाणांहून कवी वरावर राव, गौतम नवलखा आणि या तीन जणांना अटक केली होती.

कोण आहेत वरवरा राव? - वरवरा राव हे प्रसिद्ध तेलुगू कवी आहेत. त्यांचा जन्म वारांगाळ जिल्ह्यात झाला आहे. वयाच्या सतराव्या वर्षापासून त्यांनी कवितांचे लेकन करण्यास सुरुवात केली. हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी तेलुगू साहित्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. राव यांच्यावर मार्क्सवादी तत्वज्ञानाचा प्रभाव राहिला असून त्यांनी प्राध्यापक म्हणून देखील काम केले आहे. राव यांनी 15 कवितासंग्रहांचं लेखन केले आहे.

हेही वाचा - Sharad Pawar On Raj Thackeray : अजित पवारांवर धाड म्हणजे माझ्यावर धाड; शरद पवारांचे राज ठाकरेंना 'उत्तर'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.