मुंबई प्रसिद्ध जाहिरात निर्माता अरुण टिक्कू Arun Tikku murder case हत्याकांडातील Famous Advertising Producer Arun Tikku आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने आज काही अटी व शर्तीच्यावर जामीनावर सुटका करण्याचे निर्देश Mumbai High Court granted bail दिले आहे. 2012च्या अरुण कुमार टिक्कू हत्याकांडातील आरोपी Arun Tikku murder case accused सिमरन सूद जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मास्टरमाइंड विजय पालांडे आणि त्याचे साथीदार धनंजय शिंदे, मनोज गजकोश आणि सिमरन सूद यांना खून आणि टिक्कू कुटुंबाची मालमत्ता हडपण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक केली होती. Mumbai Crime
मुलगा अनुज टिक्कूतचाही होेणार होता गेम पोलिसांच्या माहितीनुसार षड्यंत्रकर्त्यांनी अरुण टिक्कूचा मुलगा अनुज टिक्कू एक प्रसिद्ध जाहिरात निर्माता आणि अनेक आघाडीच्या टीव्ही जाहिरातींमधील लोकप्रिय चेहरा होता. आरोपींनी त्याला ठार मारण्याची योजना आखली होती. एक अभिनेता म्हणून अनुजची पहिली ओळख डी.के. रब ने बना दी जोडी या चित्रपटातून झाली. त्याने रणमध्येही अभिनय केला आहे. या प्रकरणात सिमरन सूदला जामीन मंजूर झाला असला तरी इतर आरोपी अजूनही तुरुंगात आहेत. मनोज गजकोश यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती भारती डांगरे म्हणाल्या अर्जदाराला एक दशकभर लांब तुरुंगवास भोगावा लागला. खटल्याचा निष्कर्ष समोर येत नसल्याने आणखी 34 साक्षीदार तपासायचे आहेत. त्यामुळे अर्जदार जामिनासाठी पात्र आहे असे निरीक्षण न्यायालयाने जामीन देतावेळी नोंदवले आहे.
निम्मी शिक्षा भोगल्यामुळे जामीनास पात्र मनोज गजकोशचे वकील प्रशांत पांडे यांनी असा युक्तिवाद केला की 2014 मध्ये खटला वेगवान झाला असला तरी आजपर्यंत केवळ 8 ते 10 साक्षीदार तपासले गेले आहेत. अर्जदार एका दशकाहून अधिक काळ कोठडीत आहे. मनोज गजकोश जन्मठेपेची शिक्षा 20 वर्षे आहे आणि त्याने निम्मा काळ तुरुंगात घालवला आहे. हे लक्षात घेऊन जामिनावर सुटण्यास पात्र आहे. म्हणून तो फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 436A अन्वये जामिनावर मुक्त होण्याचा अधिकार आहे. हा कलम ट्रायल अंतर्गत असलेल्या कैद्याला किती कालावधीसाठी ताब्यात ठेवता येईल याच्याशी संबंधित आहे.
सहआरोपींच्या दृष्टिकोनामुळेच खटल्याला विलंब सरकारी वकील अनामिका मल्होत्रा यांनी या खटल्यातील आरोपींच्या सहभागाचे गांभीर्य सांगून जामीन अर्जाला विरोध केला आणि आरोपीला काही साक्षीदारांनी हल्लेखोरांपैकी एक म्हणून कसे ओळखले. मल्होत्रा यांनी सादर केले की आजपर्यंत 11 साक्षीदार तपासले गेले आहेत आणि केवळ सहआरोपींच्या दृष्टिकोनामुळेच खटल्याला विलंब झाला. कारण प्रत्येक सुनावणीत असंबद्ध मुद्दे उपस्थित केले जात होते. कारवाहीच्या रोजनामावर विसंबून खटल्यातील विलंबासाठी सहआरोपी विजय पालांडे जबाबदार असल्याचे फिर्यादीने सादर केले. न्यायमूर्ती डांगरे यांनी इंद्राणी मुखर्जी आणि चिंतन उपाध्यायच्या जामीन याचिकांसह सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांवर विसंबून राहिल्या. जेथे सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना दीर्घ कारावास आणि खटल्याच्या संथ गतीकडे लक्ष वेधले होते. मीडिया कंपनीच्या मालक इंद्राणी मुखर्जीवर 2012 मध्ये मुलगी शीना बोराची हत्या केल्याचा आरोप आहे. यासह कलाकार उपाध्यायवर 2015 मध्ये पत्नी हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरेश भंभानी यांच्या हत्येचा आरोप आहे. या दोन्ही प्रकरणांची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू आहे.
हेही वाचा अमरावती हत्याकांडप्रकरणी एनआयएने केली दहाव्या आरोपीला अटक