मुंबई - सायबर सेलच्या ईस्ट रिजन सायबर सेलचा ईमेल आयडी पाकिस्तानातून हॅक केला असून, त्याद्वारे मेल पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. सायबर इंटेलिजन्सला याबाबत माहिती मिळाली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर सेलच्या नावाने बनावट ईमेल -
महाराष्ट्र सायबर सेलच्या नावाने बनावट ईमेल केले जात आहेत. महाराष्ट्र सायबर सेलने एक अॅडव्हायजर जारी केला आहे. त्यात सायबर सेलच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करण्यात आला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या ईमेल आयडीवर हे मेल पाठवले आहेत, ज्यात reportintelligence.pdf नावाचे एक अटॅचमेंट देखील आहे.
सायबर सेलचा मेल हॅक -
सायबर सेलने आपल्या अॅडव्हायझरीमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, हा मेल फसवा आणि बनावट आहे. हा मेल उघडू नका. सायबर सेलने सांगितल्यानुसार हा बनावट मेल आयडी -rajeshshivajiraonagavadeps.eastcyber.mum@mahapolice.gov.in असा आहे. सायबर सेल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
हेही वाचा - Cruise Drug Case : आर्यनला 'जेल की बेल'?; आज न्यायालय देणार निकाल