ETV Bharat / city

Mumbai Corporation Budget 2022 : अर्थसंकल्पात सात हजार कोटी आरोग्यसेवा बळकटीकरणासाठी

मुंबई महापालिकेचा 2022-23 या अर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर ( Mumbai Corporation Budget 2022 ) झाला. तब्बल 45,949.21 कोटींचा हा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंग ( Commissioner Iqbal Singh Chahal ) चहल यांनी स्थायी समिती ( Mumbai Standing Committee ) समोर सादर केला. यामध्ये सर्वाधिक सात हजार कोटींती तरतूद आरोग्य सेवेसाठी करण्यात आली आहे.

Mumbai Corporation Budget 2022
Mumbai Corporation Budget 2022
author img

By

Published : Feb 4, 2022, 8:43 AM IST

मुंबई - देशातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिकेचा 2022-23 या ( Mumbai Corporation Budget 2022 ) अर्थिक वर्षाचा 45,949.21 कोटींचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल ( Commissioner Iqbal Singh Chahal ) यांनी गुरुवारी स्थायी समितील सादर केला. पालिकेचा आतार्यंतचा हा सर्वांधिक रकमेचा अर्थसंकल्प असून, त्यात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.

आरोग्य सेवेसाठी 6933.75 कोटी

मुंबईत दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. यामुळे आरोग्य सेवा बळकट करण्याकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात तब्बल ६९३३.७५ कोटींची तरतूद केली आहे. येत्या वर्षात भांडुप येथे एक सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार असून कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब रुग्णालयात सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करण्यात येणार आहे. तसेच प्रसूतीगृहांचा पुनर्विकास केला जाणार आहे

बेस्टसाठी 800 कोटी

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली बेस्ट आर्थिक संकटात आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पालिकेने आतापर्यंत ३,५०० कोटींची मदत केली आहे. तरीही बेस्ट उपक्रमाचा तोटा वाढत असळणे बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पालिकेने सन २०२२ - २३ च्या अर्थसंकल्पात ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

राणी बागेसाठी 115 कोटी

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात म्हणजेच राणी बाग पर्यटक आणि बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण आहे. या राणीबागेत पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटकांना नव्या सुविधा देण्यासाठी तसेच आधुनिकीकरण प्रकल्प राबवण्यासाठी पालिकेच्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात ११५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

विरोधकांचे टिकास्र

देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, शिवसेना मुंबई महानगरपालिकेला कर्जाच्या खाईत लोटण्याचा काम करीत आहे. मुंबई महानगर पालिकेने सादर केलेला अर्थसंकल्प हा निवडणूक अर्थसंकल्प असल्याची टीका मुंबई भाजपाचे प्रवक्ते अजय सिंह यांनी केली आहे.

हेही वाचा - Railway Budget : ६ हजार १४२ किलाेमीटर लांबीच्या ३५ नविन रेल्वे लाईन टाकणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.