ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे ५१६ नवे रुग्ण, आज सर्वात कमी मृतांची नोंद - मुंबई कोरोना लेटेस्ट न्यूज

मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ लाख ९४ हजार ९८५ वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा ११ हजार १३८ वर पोहोचला आहे. मुंबईमधून सोमवारी ५७० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

mumbai corona update
मुंबईत कोरोनाचे ५१६ नवे रुग्ण, आज सर्वात कमी मृतांची नोंद
author img

By

Published : Jan 4, 2021, 11:29 PM IST

मुंबई - गतसाली मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. १६ नोव्हेंबरला रुग्ण संख्या ४०९ पर्यंत खाली आली होती. आज (सोमवारी) मुंबईत ५१६ नवे रुग्ण आढळून आले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यात सर्वात कमी मृतांची आज नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

६ हजार ९४३ सक्रिय रुग्ण -

मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ लाख ९४ हजार ९८५ वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा ११ हजार १३८ वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज ५७० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा २ लाख ७६ हजार ३४ वर गेला आहे. सध्या मुंबईत ६ हजार ९४३ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी ३५७ दिवसांवर -

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५७, दिवस तर सरासरी दर ०.२१ टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या २१५ चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच २ हजार १५८ इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी २४ लाख ४ हजार १चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - जॅक मा बेपत्ता झाल्याने भारतीय कंपन्यांना बसणार फटकाम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.