ETV Bharat / city

Mumbai Corona Update - मुंबईत कोरोनाचे ९८ नवे रुग्ण, कोरोनाने मुंबईत आज २ जणांचा मृत्यू

मुंबईत कोरोनाचे ९८ नवे रुग्ण आज आढळलेत (98 new patients of Corona in Mumbai). मुंबईत कोरोना रुग्णसंखेत घट होत असल्याचे दिसून येत आहे. (Mumbai Corona Update) कोरोनाने मुंबईत आज २ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. (2 people died of Corona in Mumbai today)

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update
author img

By

Published : Sep 22, 2022, 9:01 PM IST

Updated : Sep 23, 2022, 3:31 PM IST

मुंबई - मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला आहे. आज ९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ८०५ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत कोरोनाचे ९८ नवे रुग्ण - मुंबईत आज २२ सप्टेंबरला ७२६६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ९८ रुग्णांची नोंद झाली. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. १३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४९ हजार ४४५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २८ हजार ९१२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८०५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६७४६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०११ टक्के इतका आहे.

मुंबईत कोरोना रुग्णसंखेत घट - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. १८ ऑगस्टला १२०१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे. १ सप्टेंबरला २७२, २ सप्टेंबरला ४०२, ३ सप्टेंबरला ३९४, ४ सप्टेंबरला ३७६, ५ सप्टेंबरला १७३, ६ सप्टेंबरला २८५, ७ सप्टेंबरला ३१६, ८ सप्टेंबरला २९०, ९ सप्टेंबरला २५१, १० सप्टेंबरला २०९, ११ सप्टेंबरला १८७, १२ सप्टेंबरला १२८, १३ सप्टेंबरला १९३, १४ सप्टेंबरला २०३, १५ सप्टेंबरला १३८, १६ सप्टेंबरला १५९, १७ सप्टेंबरला १४६, १८ सप्टेंबरला १०४, १९ सप्टेंबरला ६६, २० सप्टेंबरला १२०, २१ सप्टेंबरला ११२, २२ सप्टेंबरला ९८ रुग्णांची नोंद झाली आहे.

Last Updated : Sep 23, 2022, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.