मुंबई - काँग्रेसचे मानखुर्द, वॉर्ड क्रमांक 141 चे नगरसेवक विठ्ठल लोकरे आणि त्यांच्या पत्नी, माजी नगरसेविका सुनंदा विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेस पक्ष आणि पदाचा राजीनामा दिला आहे.
लोकरे हे पूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यांनी नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2017 मध्ये लोकरे यांनी काँग्रेसकडून महापौर पदाची निवडणूक लढवली होती. तर, सध्या ते काँग्रेसच्या स्थायी समितीचे सदस्य होते.
लोकरे पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.