ETV Bharat / city

MaharashtraBandh : मुंबईमधील बस, रिक्षासह दुकाने राहणार बंद - Bus services in mumbabi

बंद दरम्यान मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित बस, टॅक्सी, रिक्षा आदी संघटना  सहभागी होणार आहेत. तसेच व्यापारीही आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. त्यामुळे मुंबईत बंदचा परिणाम दिसणार आहे.

महाराष्ट्र बंद
महाराष्ट्र बंद
author img

By

Published : Oct 11, 2021, 12:24 AM IST

Updated : Oct 11, 2021, 7:03 AM IST

मुंबई- शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राज्यातील इतर पक्षांनी 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांचे अमानुष हत्यांकाड हत्या आणि शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. मुंबईत बंदचा परिणाम दिसून येईल.

बंद दरम्यान मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित बस, टॅक्सी, रिक्षा आदी संघटना सहभागी होणार आहेत. तसेच व्यापारीही आपली दुकाने बंद ठेवणार आहेत.

हेही वाचा-'महाराष्ट्र बंद' राजकीय हेतूनेच - गिरीश महाजन

मुंबई बंद -
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीमध्ये शेतकरी शांततापूर्वक उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून आंदोलन करत होते. परंतु केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घातल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आहे. या विरोधात केंद्र सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे, या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि या घटनेचा निषेध म्हणून बंद पुकारण्यात आला आहे. राज्यात आणि मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेना सहभागी झाल्याने बंद यशस्वी होतो, असा इतिहास आहे. यामुळे मुंबईत 100 टक्के बंद दिसून येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-उद्या महाराष्ट्रात राज्यव्यापी बंद, अत्यावश्यक सेवा वगळता 'हे' राहणार बंद

बस, रिक्षा, टॅक्सी सेवेवर परिणाम होण्याची शक्यता
बेस्टमध्ये शिवसेना प्रणित बेस्ट कामगार संघटना कार्यरत आहे. या संघटनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांच्या रिक्षा आणि टॅक्सी संघटना आहेत. महाराष्ट्र बंदमध्ये या संघटना सहभागी होणार असल्याने बेस्ट बस, रिक्षा आणि टॅक्सीच्या सेवेवर परिणाम दिसून येणार आहे.

हेही वाचा-'महाराष्ट्र बंद'ला भाजपा, मनसेचा विरोध

दुकानेही बंद राहणार -
मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाचा संसर्ग दिसून आलेला आहे. या दरम्यान बहुतेक काळ दुकाने बंद राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बंदला पाठिंबा देत व्यापारी काळ्या फिती लावून निषेध करतील असे सांगण्यात आले होते. मात्र, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आलेल्या आवाहनानुसार मुंबईतील सर्व दुकाने सायंकाळपर्यंत बंद ठेवली जाणार असल्याची माहिती फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी दिली आहे.

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार -
केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी कायदे, लखीमपूरमध्ये झालेले शेतकाऱ्यांचे हत्याकांड या विरोधात महाराष्ट्र बंद पाळला जात आहे. तरी त्यामधून अत्यावश्यक सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. यामुळे रुग्णालये सुरू राहणार आहेत. पाणी पुरवठा, दूध आणि भाज्या यांचा पुरवठा सुरळित राहणार आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त -
महाराष्ट्र बंद दरम्यान कोणत्याही प्रकारची हिंसक घटना होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून शहरात सर्व मोक्याच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरात पोलिसांकडून गस्त घातली जाणार आहे. एसआरपीएफच्या 3 कंपन्या, 500 होमगार्ड, स्थानिक शस्त्रात्र युनिटमधील 700 जवान मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

काय आहेत मागण्या -

  1. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे कृषी कायदे रद्द करावेत.
  2. कामगारांना उद्ध्वस्त करणारे कामगार कायदे रद्द करावेत.
  3. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस इंधन दरवाढ कमी करावी. महागाई कमी करावी.
  4. सरकारने सरकारी उद्योगधंद्यांचे खासगीकरण थांबवावे.
  5. लखीमपुर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये घडवून आणलेले अमानुष हत्याकांड प्रकरणी कारवाई करण्यात यावी.

Last Updated : Oct 11, 2021, 7:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.