ETV Bharat / city

Ranibagh Veermata Jijabai Bhosle Byculla Park : मुंबईकरांना जंगलाच्या राजाच्या स्वागतासाठी आणखी प्रतीक्षा; प्राणिसंग्रहालयाचा प्रस्ताव केंद्राने नाकारला - Veermata Jijabai Bhosle Byculla Park

राणीबाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले, भायखळा उद्यान ( Byculla Zoo Authority ) आणि प्राणिसंग्रहालयाने जुनागढ सक्करबाग ( Junagadh Sakkarbagh Zoo ) गुजरातमधील प्राणिसंग्रहालय आणि इंदूरमधील कमला नेहरू प्राणिसंग्रहालय ( Kamala Nehru Zoological Museum in Indore ) येथून पांढरा सिंह ( White Lion ) घेण्याची योजना आखली होती. त्या बदल्यात राणीच्या बागेकडून झेब्रा देण्यात येणार होता.

Veermata Jijabai Bhosle Byculla Park
राणीबाग वीरमाता जिजाबाई भोसले, भायखळा उद्यान
author img

By

Published : Aug 8, 2022, 12:06 PM IST

मुंबई : इस्रायलकडून झेब्रा खरेदी करण्याचा पालिकेचा प्रस्ताव फॉरेन ट्रेड्स महासंचालकांनी (डीजीएफटी) ( DGFT ) फेटाळला आहे. त्यामुळे भायखळा प्राणीसंग्रहालय ( Byculla Zoo Authority ) प्राधिकरण ( Junagadh Sakkarbagh Zoo ) आता इतर देशांतील झेब्राच्या शोधात आहे. मात्र, या विलंबामुळे मुंबईकरांना जंगलाच्या राजाच्या स्वागतासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Veermata Jijabai Bhosle Byculla Park
वीरमाता जिजाबाई भोसले, भायखळा उद्यान

आफ्रिकन हॉर्स सिकनेसला अधिकृत दर्जा नाही : राणीबाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले, भायखळा उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाने जुनागढ सक्करबाग गुजरातमधील प्राणिसंग्रहालय ( Junagadh Sakkarbagh Zoo ) आणि इंदूरमधील कमला नेहरू प्राणिसंग्रहालय येथून पांढरा सिंह घेण्याची योजना आखली होती. त्या बदल्यात राणीच्या बागेकडून झेब्रा देण्यात येणार होता. त्यासाठी गतवर्षी थायलंडस्थित गोट्रेड फार्मिंग कंपनी लिमिटेडला या झेब्राची खरेदी आणि वाहतूक करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. याबाबत प्राणिसंग्रहालयाने केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र, प्राणिसंग्रहालयाचा प्रस्ताव केंद्राने नाकारला आहे.

केंद्र सरकारने प्रस्ताव फेटाळला : गुजरात येथील जुनागढ सक्करबाग प्राणीसंग्रहालय आणि इंदूरमधील कमला नेहरू प्राणी संग्रहालय येथून पांढऱ्या सिंहांची जोडी आणली जाणार आहे. त्या बदल्यात या प्राणी संग्रहालयांना इस्रायल येथील रमत गन सफारी पार्कमधून दोन झेब्रा मागवून दिले जाणार होते. त्यासाठी राणीबागेने केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. इस्रायल देशातील झेब्रे "आफ्रिकन हॉर्स सिकनेस" आजारापासून मुक्त नसल्याने तसेच इस्रायलला "आफ्रिकन हॉर्स सिकनेस" अधिकृत दर्जा नसल्याने केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळला आहे.

भारत हा एएचएसमुक्त देश : इस्राईलला ‘आफ्रिकन हॉर्स सिकनेस’चा (एएचएस) अधिकृत दर्जा नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ‘वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ’नुसार आफ्रिकन घोड्यांच्या आजारपणाच्या बाबतीत इस्राईल हा ‘एएचएस’साठी अधिकृत दर्जा नसलेल्या देशांपैकी एक आहे. भारत हा ‘एएचएस’मुक्त देश म्हणून ओळला जातो. झेब्राच्या आयातीला केवळ एएचएसपासून मुक्त देशातून परवानगी दिली जाते.

झेब्रासाठी नवीन देशाच्या शोधात : त्यामुळे प्राणिसंग्रहालय प्रशासन आता झेब्रा मिळवण्यासाठी नवा देश शोधत असल्याचे संचालक संजय त्रिपाठी यांनी सांगितले. राणीच्या बागेला झेब्रा मिळाल्यानंतर तो गुजरातमधील प्राणिसंग्रहालयाला देऊन त्याबदल्यात सिंह घेण्याची योजना होती. त्यामुळे आता झेब्रा आल्याशिवाय सिंह येणार नसल्याचे सांगण्यात आले. परिणामी, राणीच्या बागेतील पांढऱ्या सिंहाचे आगमनही लांबणीवर टाकले आहे.

जंगलाच्या राजाची प्रतीक्षा : वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात २००५ पर्यंत तीन सिंहांचे निवासस्थान होते. या प्राणिसंग्रहालयात शेवटच्या सिंहीणीचे नाव होते. ती २०१४ मध्ये दीर्घ आजारामुळे मरण पावली. त्यापूर्वी २०१० मध्ये अनिता नावाच्या २२ वर्षांच्या एशियाटिक सिंहिणीचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. तेव्हापासून प्राणिसंग्रहालयाला सिंहाच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. भायखळ्यात गेल्या काही वर्षांपासून सुधारणा आणि नूतनीकरणाचे काम सुरू आहे.

हे प्राणिसंग्रहालय 53 एकरांमध्ये पसरलेले आहे : हे प्राणिसंग्रहालय ५३ एकरांमध्ये पसरलेले आहे आणि विस्ताराच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अतिरिक्त १० एकर जागा खरेदी करण्यात आली आहे. प्राणीसंग्रहालयाने फेब्रुवारी २०२० मध्ये औरंगाबादमधून बंगाल वाघीण शक्ती आणि करिश्माची जोडी आणली आहे. मादी वाघिणीने आता वीरा म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका पिल्लाला जन्म दिला आहे. काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातून प्राणीसंग्रहालयाने बिबट्याची जोडी आणली होती.

हेही वाचा : Abdul Sattar in trouble : शिंदे गटाचे अब्दुल सत्तार अडचणीत? दोन्ही मुलींची घोटाळ्यातील टीईटी प्रमाणपत्रे रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.