ETV Bharat / city

मुंबईत बुधवारी 34 हजार 257 लाभार्थ्यांचे लसीकरण, 493 स्तनदा मातांनाही लस

लसीकरण मोहिमेनुसार सोमवार ते बुधवारी 'वॉक-इन' पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. बुधवारी 34 हजार 257 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 30 लाख 49 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आज 493 स्तनदा मतांनाही लस देण्यात आली.

more than 34 thousand people got vaccinated in mumbai on wednesday
लसीकरण
author img

By

Published : May 27, 2021, 6:28 AM IST

मुंबई - लसीकरण मोहिमेनुसार सोमवार ते बुधवारी 'वॉक-इन' पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. बुधवारी 34 हजार 257 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 30 लाख 49 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आज 493 स्तनदा मतांनाही लस देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी -

मुंबईत 34 हजार 257 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 32 हजार 280 लाभार्थ्यांना पहिला तर 1 हजार 977 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 30 लाख 49 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 23 लाख 8 हजार 310 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 40 हजार 690 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 2 हजार 076, फ्रंटलाईन वर्करना 3 लाख 60 हजार 1, जेष्ठ नागरिकांना 11 लाख 96 हजार 594, 45 ते 59 वर्षामधील नागरिकांना 10 लाख 78 हजार 321 तर 18 ते 44 वर्षामधील नागरिकांना 1 लाख 11 हजार 515 तसेच 493 स्तनदा मातांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

लसीकरण मोहीम -

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. सोमवार ते बुधवार जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवार ते शनिवार पर्यंत कोविन ऍपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या असे आवाहन पालिकेने केले आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जाणार आहे.

एकूण लसीकरण -

आरोग्य कर्मचारी - 3,02,076

फ्रंटलाईन वर्कर - 3,60,001

जेष्ठ नागरिक - 11,96,594

45 ते 59 वय - 10,78,321

18 तर 44 वय - 1,11,515

स्तनदा माता - 493

एकूण - 30,49,000

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.