मुंबई - आजपासून परतीचा पाऊस सुरू होणार (Monsoon withdrawal begins) आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये आज संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण (Cloudy with moderate rain in Mumbai and Thane) राहील. यासोबतच या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली (Mumbai Rain Update Today) आहे.
ठाण्याच्या शेजारी असलेल्या पालघर मध्ये सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज पालघरमध्ये पुढील दोन ते तीन तास असाच जोरदार पाऊस होण्याची शक्यता, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मुसळधार पावसाची शक्यता नैऋत्य दिशेला मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन त्यानंतर मुंबईचा राज्याच्या इतर भागांमध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता (rain in Mumbai and Thane) आहे. उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या ठिकाणी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता (Mumbai Rain Update) आहे.