ETV Bharat / city

नैऋत्य मोसमी वारे अंदमान बेटावर दाखल

author img

By

Published : May 21, 2021, 7:47 PM IST

नैऋत्य मोसमी वारे शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. ही शक्यता तंतोतंत खरी ठरली असून मोसमी वारे आज अंदमान येथे दाखल झाले आहेत.

नैऋत्य मोसमी वारे अंदमान बेटावर दाखल
नैऋत्य मोसमी वारे अंदमान बेटावर दाखल

मुंबई - नैऋत्य मोसमी वारे शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. ही शक्यता तंतोतंत खरी ठरली असून मोसमी वारे आज अंदमान येथे दाखल झाले आहेत. त्यानुसार मान्सूनने अंदमान निकोबार बेटावर प्रवेश केला आहे.

'मोसमी पाऊस अंदमानात पोहोचला'

हवामान खात्याचे वरिष्ठ वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनीही ट्विट करुन मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती दिली. मोसमी पाऊस आज अंदमानात पोहोचला, असे ट्विट होसाळीकर यांनी केले आहे. भारतीय हवामान विभागाने या अगोदर एक जूनला मान्सून दाखल होईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे मान्सूनची वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. 21 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटावर पोहोचतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मान्सूनचा प्रवेश
देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मान्सूनचा प्रवेश होतो. केरळमध्ये सर्वप्रथम मान्सूनचे आगमन होते. केरळमध्ये दरवर्षी १२० दिवसांच्या पावसाळ्यामध्ये सरासरी २०४.९ सेंटिमीटर मान्सूनची नोंद होत होती. पण गेल्यावर्षी केरळमध्ये सरासरीच्या तब्बल ९ सेंटिमीटर अधिक म्हणजेच २२२.७९ सेंटिमीटर इतका पाऊस पडला.

नागरिकांना दिलासा
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर सहा दिवसांनतर महाराष्ट्रात दाखल होतो. 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात आणि मुंबईत दाखल होईल. 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मान्सून सामान्यच्या 98 टक्के राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. यावेळी देखील तौक्ते चक्रीवादळमुळे मान्सून लांबीवर पडेल असे वाटत होते. मात्र हवामान विभागाने दिलेल्या माहितीमुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा - बार्ज पी-305 : नातेवाईकांच्या नाराजीनंतर ४४ मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण, २३ जणांची ओळख पटली

हेही वाचा - गडचिरोलीत पोलीस-नक्षल्यांदरम्यान चकमक, 13 नक्षल्यांना कंठस्नान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.