ETV Bharat / city

मनसेची अ‍ॅमेझॉनविरोधात ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ मोहीम - ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’

ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. मात्र याविरोधात अ‍ॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतली आहे. अ‍ॅमेझॉन मनसेच्या या मागणी विरोधात न्यायालयात गेल्याने मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने आता अ‍ॅमेझॉनविरोधात ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ मोहीम सुरू केली आहे.

'No Marathi, No Amazon' campaign
मनसेची अ‍ॅमेझॉनविरोधात ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ मोहीम
author img

By

Published : Dec 6, 2020, 2:06 AM IST

मुंबई - ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. मात्र याविरोधात अ‍ॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतली आहे. अ‍ॅमेझॉन मनसेच्या या मागणी विरोधात न्यायालयात गेल्याने मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने आता अ‍ॅमेझॉनविरोधात ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ ही नवी मोहीम सुरू केली आहे. याचा फटका अ‍ॅमेझॉनला बसण्याची शक्यता आहे.

अ‍ॅमेझॉनने आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मनसेने केली होती. मात्र याविरोधात अ‍ॅमेझॉनने न्यायालयात धाव घेत, आपण अ‍ॅपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करू शकत नसल्याचे सांगितले. यावरून मनसे आणि अ‍ॅमेझॉनमधील वाद चांगलाच पेटला आहे. अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा नसेल तर महाराष्ट्रात मराठी माणसांनी अ‍ॅमेझॉनचं अ‍ॅप का वापरावं? असा सवाल मनसेच्या स्टुडंट विंगच्या अखिल चित्रे यांनी उपस्थित केला आहे. तसेच अ‍ॅमेझॉनविरोधात ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ ही नवी मोहीम मनसेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.