मुंबई - औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा औरंगाबाद का संभाजीनगर या मुद्यांवर राजकारण तापले आहे. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. कॉंग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेनेचे मरण झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधानंतर आता या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे.
अब्दुल सत्तार खरे बोलले कि खोटे?-
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तार यांचे विधान असणारे एक वृत्तपत्रातील कात्रण देखील ट्विट त्यांनी केले आहे. संभाजीनगर हेच नामकरण झाले पाहिजे, श्रेय केंद्र अथवा राज्य सरकार कोणीही घ्यावे. सेनेला केवळ एवढे विचारावे वाटते की तुमचे मंत्री अब्दुल सत्तार खरे बोलले कि खोटे? सोबत जोडलेला फोटो बरेच काही सांगून जात आहे. माननीय बाळासाहेबांचा शब्द व स्वप्न पूर्ण करावे. असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द तुम्ही खरा करणार की नाही -
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 रोजी औरंगाबादच्या महानगरपालिकेमध्ये निवडणुकी दरम्यान औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. तेव्हापासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे अशी सर्वांची भावना आहे. मात्र, या मागणी बाबत आता असलेले राज्य सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेतात हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या पक्षामध्ये आता निष्ठावंत म्हणून आलेले मंत्री अब्दुल सत्तार म्हणणात मी संभाजीनगर म्हणणार नाही मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद हेच बोलण्याची मुभा दिली आहे. हे जर खर असेल मुख्यमंत्री आणि हे खरं की खोट हे जनतेला सांगितले पाहिजे. श्रेय केंद्र सरकार घ्यावे किंवा राज्य सरकारने मात्र जनेतची संभाजीनगर हेच नाव असावे या भावनेचे आदर राखणे आवश्यक आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी भरसभेत औरंगाबादचे संभाजीनगर हे नामांतर होणार हा शब्द जनतेला दिला होता. हा शब्द तुम्ही खरा करणार की नाही असा सवाल ही नांदगावकर यांनी शिवसेनेला विचारला आहे.