मुंबई - गेल्या 14 दिवसांपासून आझाद मैदानावर सुरू असलेल्या विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मनसे नेते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी भेट दिली. येत्या दोन ते तीन दिवसांत शिक्षकांच्या मागण्या मार्गी लागतील, असे आश्वासन यावेळी शिक्षकांना देण्यात आलेला आहे. तसेच शिक्षकांचा आंदोलना मनसेने पाठींबा दिला आहे. मात्र शासनाने वेळ मागितला असून आपल्याला संयमाने दोन-तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट-
शिक्षण समनव्य संघाचे शिष्टमंडळ आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत मनसेचे नेते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर उपस्थित होते. या बैठकीत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आश्वासन दिले की येत्या दोन ते तीन दिवसात विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांचा मागण्या पूर्ण केल्या जातील. त्यासाठी आम्हाला तीन ते चार दिवसाचा कालावधी पाहिजे, असं मनसे नेते अमित ठाकरे समोर आश्वासन देण्यात आले आहे.
मनसे शिक्षकांचा पाठीशी उभी-
शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतर मनसे नेते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी आझाद मैदानावर विनाअनुदानित अंशत अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनात भेट दिली. तुमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत, असे आश्वासन मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिक्षकांना दिले आहे. शिक्षकांना संबोधित करताना अमित ठाकरे यांनी शिक्षकांना आत्मदहनासारखे जोखीमचं पाऊल उचलू नका, असे आव्हान केले आहे.
दोन ते तीन दिवसात निघणार जीआर-
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला धारेवर धरत शिक्षकांची समजूत काढली. त्यांनी सांगितले की, विनाअनुदानित आणि अंशत अनुदानित शाळेतील शिक्षकांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. सत्ता येतात आणि जातात मात्र शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच शिक्षकांच्या पाठीशी उभी राहिली आहे. शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत एक दोन दिवसांचा वेळ मागितला असून लवकरच अनुदान देण्यासबंधीत शासनाकडून जीआर काढण्यात येणार आहे. तसेच आम्ही काही सूचना सुद्धा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिलेल्या आहे. त्यानुसार येत्या दोन तीन दिवसांत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागणार आहे.
हेही वाचा- संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?