मुंबई- मनसेचे नेते संदीप देशपांडे हे कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. ते सातत्याने शिवसेना आणि त्यांच्या आघाडीतील नेत्यांवर टीका करतात. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिलेली मुलाखत आज प्रसिद्ध केली आहे. त्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दोघांवरही टीका केली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत || ‘साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले || म्हटले आहे. यापूर्वी संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आहेत, अशी शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी टीका केली होती. संदीप देशपांडे यांनी दुसरे ट्विट करत अडीच वर्षे संपत्ती झाली आता पुढची अडीच वर्षे "simpathy' अशी टीका केली.
-
|| ‘साहेब’ जैसा जैसा बोले
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
हा तैसा तैसा चाले
म्हणून यांचे आस्तित्व बुडाले || pic.twitter.com/0T2906UAsS
">|| ‘साहेब’ जैसा जैसा बोले
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2022
हा तैसा तैसा चाले
म्हणून यांचे आस्तित्व बुडाले || pic.twitter.com/0T2906UAsS|| ‘साहेब’ जैसा जैसा बोले
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2022
हा तैसा तैसा चाले
म्हणून यांचे आस्तित्व बुडाले || pic.twitter.com/0T2906UAsS
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बहुप्रतिक्षित मुलाखतीमधील (Uddhav Thackeray Interview) आज पहिला भाग प्रसारीत करण्यात आला आहे. या मुलाखतीत त्यांनी बंडखोरीसह इतर मुद्यांवर भाष्य केले आहे.
सत्तांतराच्या हालचाली सुरु होत्या- मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे कधीही बाहेर पडले नाहीत, असा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला. या काळात उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया देखील झाल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे राज्यभर फिरले नाही, असंही सांगण्यात आलं.
यापूर्वीही संदीप देशपांडे यांनी उडविली होती खिल्ली-शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेचे 39 आमदार फोडत उद्धव ठाकरेंसोबत बंडखोरी केली. त्यानंतर शिंदे गटाने भाजप सोबत हात मिळवणी करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज या शिंदे फडणवीस सरकारची बहुमत चाचणी पार पडली. या सर्व घडामोडी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी आता शिवसैनिकांना शिवबंधन नंतर एक प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाची आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक मीम शेअर करत खिल्ली उडवली होती.
हेही वाचा- Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात सर्वात कमी वयाचे शहीद जवान, 'असा' होता मनजीत सिंग यांचा पराक्रम
हेही वाचा- Uddhav Thackeray Interview: घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला- उद्धव ठाकरे