ETV Bharat / city

शिवाजी पार्कात मनसेचा पाडवा मेळावा; राज ठाकरे यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी - मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कात मनसेचा पाडवा मेळावा

मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कात मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः लाखो कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंबईत मनसेचे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे. याच मेळाव्यानिमित्त आलेले पालघरचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी केलेल्या देखाव्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

MNS Padwa melava at Shivaji Park
राज ठाकरे यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी
author img

By

Published : Apr 2, 2022, 5:53 PM IST

Updated : Apr 2, 2022, 6:11 PM IST

मुंबई - आज मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कात मनसेचा पाडवा मेळावा ( MNS Padwa Melava at Shivaji Park ) होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः लाखो कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंबईत मनसेचे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे. याच मेळाव्यानिमित्त आलेले पालघरचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी केलेल्या देखाव्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिल्या शुभेच्छा

भ्रष्टाचाराचा आसूड - तुळशी जोशी यांनी आपल्या दोन कार्यकर्त्यांना एकाला काळा रंग लावलाय तर दुसऱ्याला पूर्ण भगवा रंग लावला आहे. काळा रंग लावलेल्या कार्यकर्त्यावर भ्रष्टाचारी सत्ताधारी असे लिहिले असून भगवा रंग लावलेल्या कार्यकर्त्याच्या अंगावर एक संधी मनसेला द्या असे लिहिले आहे. हा भगवा रंग लावलेला कार्यकर्ता काळ्या रंगाच्या कार्यकर्त्याला चाबकाने म्हणजेच भ्रष्टाचाराला चाप मारतोय असे दाखवण्यात आला आहे.

अयोध्या दौऱ्याच्या घोषणेकडे लक्ष - आजच्या सभेच्या निमित्ताने राज ठाकरे अयोध्या दौऱ्याची घोषणा करणार का ? याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली असून तुलसी जोशी यांच्या कार्यकर्त्यांनी राज तीलक की करो तैयारी आ रहे है भगवा धारी असे पोस्टर लावल्या आहेत. दरम्यान, पालघर वरून आलेल्या या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ओवाळले व त्यांना मिठाई खाऊ घालून त्यांचे तोंड गोड केले व त्यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - Mumbai Metro New Lines : मुंबईत दोन नव्या मेट्रो लाईन्सचे उद्घाटन.. मुख्यमंत्री ठाकरेंनी दाखवला हिरवा झेंडा

Last Updated : Apr 2, 2022, 6:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.