ETV Bharat / city

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूवरून संदीप देशपांडे यांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले... - sandip deshpande on uddhav thackeray

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूवरून देशपांडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकार आणि मुख्यमत्र्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

संदीप देशपांडे
संदीप देशपांडे
author img

By

Published : Sep 2, 2020, 8:11 PM IST

मुंबई - पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला जबाबदार धरले असून, जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच याला जबाबदार असल्याचा आरोप देशपांडे यांनी सोशल मीडियावर केला आहे.

'सरकारच्या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू झाला. तुम्ही यंत्रणा नीट चालवत नाही. यंत्रणा नीट चालते की नाही, याची माहिती घेण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं आहे. ती जबाबदारी त्यांना पार पाडता येत नसेल तर त्यांनी पदावर राहू नये. तुम्हाला घरी बसवून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री केलेलं नाही.' अशा शब्दांत मुख्यमंत्री व राज्य शासनावर देशपांडे यांनी हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठीच बाहेर येणार का? लोकांचे दुःख जाणून घ्यायला रस्त्यावर कधी उतरणार? असे सवालही देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत. बीकेसी, नेस्को किंवा परवा पुण्यात उद्घाटन झालेलं कोव्हिड सेंटर असेल, यात लोकांना उपचार मिळत नसतील तर सरकारला लाज वाटली पाहिजे. कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी मोठी कंत्राट द्यायची, मात्र त्याचा सामान्यांना कितपत फायदा होतो? अशी शंका देखील देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ घरात राहणारे मुख्यमंत्री, भाजपचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.