मुंबई : सोमवारी (21 मार्च) मनसेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती संपूर्ण राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात ( Shivjayanti Celebrations By MNS) आली. मनसेच्या या शिवजयंती वरून अनेक पक्षातील नेत्यांनी यांच्यावर टीका ( Amol Mitkari Criticized MNS ) केली. काहींनी तर त्यांची बुद्धी काढली. अशीच काहीशी टीका राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली ( Amol Mitkari Tweet ) होती.
'अशांना भर चौकात फटके दिले पाहिजेत'
मिटकरी यांच्या टिकेला आता मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी उत्तर दिले ( Amey Khopkar Criticized Amol Mitkari ) आहे. खोपकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं असून त्यात त्यांनी म्हटलंय की, "तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत." असं खोपकर यांनी म्हटलं आहे.
-
तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 22, 2022तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 22, 2022
अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर
दरम्यान मनसे नेते अमेय खोपकर यांच्या टीकेवर अमोल मिटकरी यांनी देखील प्रत्युत्तर दिले असून, आपल्या ट्विटमध्ये "माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे l कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही" असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.
-
माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे l
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही ll
">माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे l
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 22, 2022
कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही llमाझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे l
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 22, 2022
कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही ll
नेमकं काय म्हणाले होते मिटकरी
मनसेच्या शिवजयंती बद्दल प्रतिक्रिया देताना मिटकरी म्हणाले होते की, "तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्या मागे फक्त राजकारण आहे."