ETV Bharat / city

मनसे अन् मुंबई महापालिका आमने-सामने, हिंदू स्मशानभूमीतील खत प्रकल्पालावरू पेटला वाद - हिंदू स्मशानभूमी

हिंदू स्मशानभूमीला कचरा भूमी करण्याचे काम महानगरपालिका करत असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे. प्रभादेवी येथील कांदेवाडी स्मशानभूमी येथे पालिकेतर्फे खत प्रकल्प राबवला जात आहे. यासाठी वरळी येथील कचरा या ठिकाणी आणला जातो व त्याचे वर्गीकरण केले जाते. मात्र, या प्रकल्पाला मनसेने विरोध दर्शवला आहे. हिंदू स्मशान भूमीमध्येच हा प्रकल्प का? इतरांच्या स्मशानभूमीत असा प्रकल्प राबवाल का? असा प्रश्न मनसे नेते संतोष धुरी यांनी विचारला आहे.

हिंदू स्मशानभूमीतील खत प्रकल्पावा मनसेचा विरोध

author img

By

Published : Oct 14, 2021, 10:25 AM IST

मुंबई - हिंदू स्मशानभूमीला कचरा भूमी करण्याचे काम महानगरपालिका करत असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे. प्रभादेवी येथील कांदेवाडी स्मशानभूमी येथे पालिकेतर्फे खत प्रकल्प राबवला जात आहे. यासाठी वरळी येथील कचरा या ठिकाणी आणला जातो व त्याचे वर्गीकरण केले जाते. मात्र, या प्रकल्पाला मनसेने विरोध दर्शवला आहे. हिंदू स्मशान भूमीमध्येच हा प्रकल्प का? इतरांच्या स्मशानभूमीत असा प्रकल्प राबवाल का? असा प्रश्न मनसे नेते संतोष धुरी यांनी विचारला आहे.

पत्रकार परिषद

मनसेचा आक्षेप

आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक आक्रमक झाले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नव निर्माण सेना वेगवेगळ्या विषयांवर शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभादेवी येथील हिंदू स्मशानभुमीमध्ये महानगरपालिकेकडे खत प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प करताना वरळी कोळीवाडा येथील कचरा या ठिकाणी आणला जातो. त्याचे वर्गीकरण या ठिकाणी करण्यात येते. यावर मनसेने आक्षेप घेतला आहे. हा प्रकल्प बंद करावा अशी मागणी मनसेने केली आहे.

हिंदू स्मशानभूमी मध्येच हा प्रकल्प का?

या स्मशानभूमीमध्ये वरळी कोळीवाडा मधील कचरा एकत्रित केला जातो. तो इथे आणला जातो आणि इकडे खत निर्मितीचा प्रकल्प महानगरपालिकेने चालू केला आहे त्यासाठी हा कचरा वापरला जातो. हा प्रकल्प चालू केला आहे याची स्थानिकांना कोणतीही याबाबतची कल्पना नाही आहे. अचानक येऊन इकडे खत निर्मितीचा प्रकल्प चालू केला आहे. प्रत्येक कामासाठी वेगवेगळी आरक्षण असते मग हिंदू स्मशान भूमीमध्ये हा प्रकल्प का राबवला? तुम्ही दुसऱ्याच्या स्मशानभूमीमध्ये हा प्रकल्प राबवणार का असा सवाल मनसे नेते संतोष धुरी यांनी विचारला आहे.

जोरदार आंदोलन

आमचा पक्ष कायदा हातात घेतो असे बोलले जाते. मात्र, सुरुवातीला आम्ही प्रक्रियेनुसार मागणी करतो. हा प्रकल्प बंद व्हावा यासाठी आम्ही देखील पत्रव्यवहार केला होता. मात्र, दोन पत्रात त्यांनी वेगवेगळे उत्तर आम्हाला दिलेली आहे. पालिका अधिकारी आम्हाला वेळ देत नाही. जर प्रकल्प बंद झाला नाही तर मात्र स्थानिक लोक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या विरोधात जोरदार आंदोलन करू असा इशारा मनसे नेते संतोष धुरी यांनी दिला आहे.

मनसेचा हिंदू कार्ड खेळण्याचा प्रयत्न

प्रभादेवी, वरळी या भागांमध्ये हिंदूंची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. हिंदू स्मशानभूमीचा भावनिक विषय घेऊन आगामी महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेकडून हिंदू कार्ड खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. फक्त हिंदूंच्या स्मशानभूमीवर असा प्रकल्प का असा सवाल विचारत हिंदूंना आकर्षित करण्याचा मनसेचा प्रयत्न दिसत आहे.

हेही वाचा - खासदार नवनीत राणांकडून सातत्याने कोरोना नियमांचे उल्लंघन; दुर्गोत्सवात केले ढोलवादन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.