ETV Bharat / city

MLA Rais Shaikh Letter to Home Minister : मुंबईत देखील धार्मिक वाद पेटण्याची शक्यता; रईस शेख यांचे गृहमंत्र्यांना पत्र

author img

By

Published : Feb 12, 2022, 1:25 PM IST

एसएनडीटी महिला विद्यापीठाची संलग्न असलेल्या एमपी शहा कॉलेजने हिजाब बंदीचा निर्णय घेतल्याने आता मुंबईत देखील धार्मिक वाद पेटण्याची शक्यता आहे. या नियमांमध्ये दुपट्टा, घुंगट आणि बुरखा घालून कॉलेजमध्ये येऊ शकत नाही, असे कॉलेजने स्पष्ट लिहिले आहे. यामुळे महाविद्यालय प्रशासनाला समज देण्याचे आवाहन समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्राद्वारे ( MLA Rais Shaikh letter to Home Minister ) केले आहे.

MLA Rais Shaikh Letter to Home Minister
रईस शेख यांचे गृहमंत्र्यांना पत्र

मुंबई - एसएनडीटी महिला विद्यापीठाची संलग्न असलेल्या एमपी शहा कॉलेजने हिजाब बंदीचा निर्णय घेतल्याने आता मुंबईत देखील धार्मिक वाद पेटण्याची शक्यता ( MLA Rais Shaikh letter about hijab controversy ) आहे. या नियमांमध्ये दुपट्टा, घुंगट आणि बुरखा घालून कॉलेजमध्ये येऊ शकत नाही, असे कॉलेजने स्पष्ट लिहिले आहे. यामुळे महाविद्यालय प्रशासनाला समज देण्याचे आवाहन समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्राद्वारे ( MLA Rais Shaikh letter to Home Minister ) केले आहे.

MLA Rais Shaikh Letter to Home Minister
रईस शेख यांचे गृहमंत्र्यांना पत्र

काय म्हटले रईस शेख?

"आपल्या निदशर्नास आणू इच्छितो की, महाराष्ट्रातील महिलांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीचे मणीबेन एम. पी. शाह वूमन कॉलेजच्या माहिती पत्रकामध्ये देखील विद्यार्थ्यींना हिजाब परिधान करण्याबाबत बंदी आहे. आपल्या माहितीसाठी हे माहिती पत्रक सोबत जोडत आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रामध्ये इतर शिक्षण संस्थामध्ये देखील विद्यार्थ्यींना हिजाब परिधान करण्याबाबत बंदी असू शकते त्यामुळे सदर बाब ही भेदभावजनक असून धार्मिक तणाव संघर्ष वाढवणारी आहे. तरी प्रत्येकाला भारतीय संविधानानूसार मूलभूत हक्क बहाल केले असून वेश परिधान करण्याचा हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक हक्क आहे. तरी महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्थामध्ये वेश परिधान करण्याबाबत असलेला निर्णय कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार व दुजाभाव करणारा असता कामा नये."

रईद शेख यांची गृहमंत्र्यांना विनंती -

"आपणांस विनंती आहे की, आपण आपल्या स्तरावरून महाराष्ट्रातील शिक्षण संस्थाना वेश परिधानबाबत कोणत्याही प्रकारच्या विद्यार्थीनींच्या धार्मिक भावना दुखविल्या जाणार नाहीत, अशाप्रकारची विशेष सूचना देण्यात यावी. हि विनंती." असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

'धार्मिक द्वेषाचे राजकारण'

कर्नाटकामध्ये सुरू असणाऱ्या हिजाबला विरोध करणाऱ्यांचा देशभर निषेध होत आहे. दरम्यान, कर्नाटकात सुरू असलेलं हे धार्मिक द्वेषाचे राजकारण आता महाराष्ट्रात देखील पसरणार का ? हे पाहाने महत्त्वाचे ठरणार आहे. असेही ते म्हणाले.

हेही वाचा - Minister Bhumre In Trouble: रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह मुलावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.