ETV Bharat / city

कंगणाचं थोबाड फोडण्याच्या वक्तव्यावर शिवसेना ठाम, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी तुरुंगात जायला तयार

अभिनेत्री कंगणा रनौत हिने मुंबईतील वातावरण पाकिस्तानसारखे झाल्याचे ट्विट केले होते. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही धमकावल्याचा आरोप केला होता. यानंतर सर्वत्र ट्वीटर वॉर सुरू झाले. यानंतर सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगणाच्या कानशिलात लावण्यासंबंधी ट्विट केले; आणि आणखी वातावरण चिघळले. आता पुन्हा सरनाईक यांनी ट्विट करून आगीत तेल ओतले आहे.

author img

By

Published : Sep 5, 2020, 12:14 PM IST

Updated : Sep 5, 2020, 12:22 PM IST

MLA pratap sarnaik tweet
आमच्या रणरागिणी कंगणाचं थोबाड फोडतील', असे ट्वीट सरनाईकांनी केले होते.

मुंबई - अभिनेत्री कंगणा रनौत हिने मुंबईतील वातावरण पाकिस्तानसारखे झाल्याचे ट्विट केले होते. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही धमकावल्याचा आरोप केला होता. यानंतर सर्वत्र कंगणावर टीका होऊ लागली. ट्विटर वॉर सुरू झाले. सेनेसोबतच बॉलीवूड आणि मनसेही यामध्ये उतरले. यानंतर सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगणाच्या कानशिलात लावण्यासंबंधी ट्विट केले; आणि आणखी वातावरण चिघळले.

  • मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही.

    — Pratap Sarnaik (@PratapSarnaik) September 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'आमच्या रणरागिणी कंगणाचं थोबाड फोडतील', असे ट्वीट सरनाईकांनी केले होते. या प्रकरणानंतर पुन्हा महिला आयोगाने आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त केली. मात्र आज सरनाईकांनी आणखी एक ट्विट करून प्रकरण चिघळवण्याचे संकेत दिले आहेत. मी माझ्या विधानावर ठाम असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 106 वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही, असे ते म्हणाले.

  • कंगनाला खासदार @rautsanjay61 नी सौम्य शब्दांत समज दिली.ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.

    — Pratap Sarnaik (@PratapSarnaik) September 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले, तरी मी तयार आहे, असा इशाराच त्यांनी दिलाय. यामुळे संबंधित प्रकरण आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत.

Last Updated : Sep 5, 2020, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.