मुंबई : शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे (Mla Nitesh Rane ) यांचा अटकपूर्ण जामीन जिल्हा सत्र न्यायलयाने फेटाळला आहे. यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय निलेश राणे यांच्या वकीलांनी घेतला असून, ते अद्यापही संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहे. त्यातच आता, गिरगावातील भाजप कार्यालयासमोर बँनरबाजी करण्यात आली आहे. यावर नितेश राणे हरवले असल्याचे लिहले ( Mla Nitesh Rane Missing Banner ) आहे. तसेच, शोधून देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस देण्यात येईल, असेही लिहले आहे.
मुंबईत गिरगावात भाजप कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या बँनरबाजीमुळे राणे विरुद्ध शिवसेना (Shivsena Vs Rane ) असा वाद रंगणार आहे. या बँनरवर नितेश राणे हे गायब असल्याचे ( Mla Nitesh Rane Missing Banner ) सांगण्यात आले आहे. त्यांना शोधून काढणाऱ्यास एक कोंबडी बक्षिस म्हणून दिले जाईल असे लिहीत नितेश राणे यांची माहितीही बँनरवर सांगण्यात आली आहे. हे बँनर कोणी लावले याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण, यामुळे तळ कोकणातील शिवसेना विरुद्ध राणे हा शिमगा आता मुंबईतही सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
दरम्यान, आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी पार पडली. यावेळी पोलिसांना विशेष तपासण्याची आवश्यकता असून, त्यांच्या मोबाईलची तपासणी करण्यासाठी जामीन फेटाळल्याचे न्यायालयाने सांगितले. मात्र, नितेश राणे कोठे आहेत याचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नसून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - Citizens Attack Police In Yerawada Area : येरवडा परिसरात संशयीत गुन्हेगारासह नागरिकांचा पोलिसांवर हल्ला