मुंबई - सैन्यातील तुकडीचे नेतृत्व महिलांकडे देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा सकारात्मक निर्णय आज(सोमवार) सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. दरम्यान, भारतीय सैन्यात महिलांना मिळणारी संधी म्हणजे भारतीय लोकशाहीत गौरवाचे स्थान निर्माण करणारी आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेच्या उपसभापती व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी या निर्णयाचे स्वागतच केले आहे.
महिलांना नेहमी संघर्ष करून प्रगतीची संधी मिळते, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने स्वतःच पाठबळ हे सर्वसामान्य महिला असो किंवा सैन्यातील महिला यांच्या मागे ठेवले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्रच्या व देशाच्या इतिहासात झाशीची राणी व जिजाऊ माता भोसले, तारा राणी यांनी फार मोठे पराक्रम केले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यात महिलांना मिळणारी संधी ही भारतीय लोकशाहीत फार मोठं गौरवाच स्थान असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
हेही वाचा -