ETV Bharat / city

आमदार जयदत्त क्षीरसागर 'मातोश्री'च्या दारात.. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का ! - jaydatta kshirsagar

आमदार क्षीरसागर यांचे मातोश्रीवर जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

जयदत्त क्षीरसागर 'मातोश्री'वर
author img

By

Published : Apr 7, 2019, 7:56 AM IST

Updated : Apr 7, 2019, 11:59 AM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज असलेले आमदार जयदत्त क्षीरसागर हे शनिवारी मातोश्रीवर गेले होते. क्षीरसागर यांचे मातोश्रीवर जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

मातोश्रीवर जाताना जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत क्षीरसागर कुटुंबीयांनी ठाकरे कुटुंबीयांना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा दिल्या.

लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर हे होते. मात्र २ दिवसांपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात बीडमध्ये भूमिका घेतली होती. भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना समर्थन दिले होते. कार्यकर्ता मेळावा दरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेल्या अन्यायाचा पाढाच कार्यकर्त्यांसमोर वाचून दाखवला. बीड लोकसभा मतदारसंघात जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. यावरून जयदत्त क्षीरसागर हे भाजपात जाणार अशी विरोधकांमध्ये चर्चा सुरू असतानाच क्षीरसागर यांनी मात्र मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा दिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे विरोधकांसह कार्यकर्ते यांच्यात संभ्रम निर्माण झाला.

या सगळ्या घडामोडीमधील दुसरी बाजू म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा प्रचार करत आहेत. भविष्यात बीड विधानसभा मतदारसंघातून पुतणे संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याला बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी समर्थन दिले आहे. जयदत्त क्षीरसागर यांचे खच्चीकरण करण्यासाठी पुतणे संदीप क्षीरसागर यांना पुढे केले जात असल्याचा आरोप स्वतः आ. क्षीरसागर यांनी २ दिवसापूर्वी झालेल्या मेळाव्यात देखील केला. आता बीड लोकसभा मतदारसंघात काका भाजपच्या उमेदवाराला लीड मिळवून देणार की, पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देणार यावरच येणाऱ्या बीड विधानसभा मतदारसंघाचा नायक ठरेल.

Intro:सूचना- ,फोटो डेस्कच्या नंबरवर पाठवले आहेत

राष्ट्रवादीचे नाराज नेते मातोश्रीच्या दारात, राष्ट्रवादीला धक्का...

मुंबई 6

गुढी पाडव्याच्या दिवशी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर आणि भारतभूषण क्षिरसागर ( बीड जिल्हा नगराध्यक्ष ) यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत क्षिरसागर कुटुंबीयांनी ठाकरें कुटुंबीयांना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा दिल्या.गेले काही महीने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षिरसागर यांचे मातोश्रीवर येण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथा पालथ झाली असून राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी येन प्रचारात हादरा बसला आहे...Body:....Conclusion:
Last Updated : Apr 7, 2019, 11:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.