ETV Bharat / city

जिल्हा परिषदेच्या शाळांचा खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न - वर्षा गायकवाड - zp school electricity bill

राज्यात वाढत्या उन्हातच विजेचा फार मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा (Power Shortage) भासत आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वीज बिल (ZP School Electricity Bill) न भरल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. याबाबत मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांची भेट घेतली आहे.

varsha gaikwad
मंत्री वर्षा गायकवाड
author img

By

Published : Apr 14, 2022, 7:42 PM IST

मुंबई - राज्यात वाढत्या उन्हातच विजेचा फार मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा (Power Shortage) भासत आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वीज बिल (ZP School Electricity Bill) न भरल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. हा खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले जात आहेत. याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) त्याचप्रमाणे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली असल्याचे सांगितले आहे. मुंबईत त्या बोलत होत्या.

१४ कोटींचा निधी मंजूर - राज्यातील जिल्हा परिषदेच्या खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून अधिकचा निधी मंजूर करून घेतला आहे. राज्यात जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल भरणे बाकी असल्याने वीज मंडळाने राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. ही रक्कम अनेक कोटी रुपयांमध्ये असल्यामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. याबाबत आता शिक्षण विभागाला जागग आली असून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अर्थमंत्री अजित पवार त्याचबरोबर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबत बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. यापूर्वी ७ कोटीचा निधी देण्यात आला होता आता १४ कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच लवकरात लवकर खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.