ETV Bharat / city

रेमडेसिवीर उत्पादन कंपनीला मंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट, उत्पादन वाढवण्याचे केले आवाहन

author img

By

Published : Apr 28, 2021, 7:10 PM IST

रेमडेसिवीर या औषधाचा पुरवठा सुरळीत व्हावा, तसेच त्याचे उत्पादन कसे वाढवता येईल याची पाहणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विविध औषध निर्मिती कंपन्यांना प्रत्यक्ष भेट दिली आहे.

रेमडेसिवीर कंपनीला शिंगणे यांची भेट
रेमडेसिवीर कंपनीला शिंगणे यांची भेट

मुंबई - कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर या औषधाचा पुरवठा सुरळीत व्हावा, तसेच त्याचे उत्पादन कसे वाढवता येईल याची पाहणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विविध औषध निर्मिती कंपन्यांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. कंपनीने उत्पादनात वाढ करावी, दर्जेदार औषधे रुग्णांना उपलब्ध व्हावी यासाठी उत्पादकांनी प्रयत्नशील राहावे, असेही आवाहन डॉ. शिंगणे यांनी या कंपन्यांना केले आहे.

राज्यात कोरोनाच संकट वाढत आहे व त्यावर उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा भासत आहे. रेमडेसिवीर या औषधाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्याचे उत्पादन कसे वाढवता येईल या अनुषंगाने डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तारापूर MIDCतील मे. कमला लाईफ सायन्सेस या उसनवारी परवान्यावर काम करणाऱ्या कंपनीस भेट दिली. कंपनीच्या उत्पादन क्षमतेचा व प्रत्यक्ष होत असलेल्या उत्पादनाचा आढावा घेतला. सदर कंपनी दर दिवशी 35000 रेमडेसिवीर कुपींची निर्मिती करत असून कंपनी ने आतापर्यंत 6 लाख कुपींची निर्मिती केली आहे. त्यातील 4 लाख कुपी सिपला कंपनीस दिल्या व सुमारे 2 लाख कुपी पॅकिंगच्या प्रक्रियेत आहेत, असे कंपनीचे चेअरमन डॉ. झंवर यांनी सांगितले. या कंपनीची रेमडेसिवीर लिक्विड इंजेक्शन व लॉयपीझेड इंजेक्शन निर्माण करण्याची एकत्रित क्षमता 2 लाख कुपी दर दिवस इतकी आहे.

मे. कमला लाईफ सायन्सेस ही इंजेक्शन निर्मिती करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी असून, ती त्यांच्या क्षमतेच्या 10 टक्के उत्पादन सिपलासाठी करते व उर्वरित इतर औषधाचे उत्पादनासाठी इतर कंपन्यासाठी करते. सदर कंपनी जुबिलेंट, हेटेरो, डॉ. रेड्डीज इ. यांचेसाठीही रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादन करणार असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले. सिपला कंपनीचा रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी लागणारा एपीआय (Active pharmaceutical ingredients) त्यांचेकडे असून ते लिक्विड इंजेक्शनच्या 35000 च्या 3 बॅचेस व lyophilized इंजेक्शनची एक बॅच तयार करू शकतात. उत्पादनासाठीचा सहाय्यक घटक बेटाडेक्स आयात केला जातो, त्याची कमतरता असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले. सदर घटक पुरेश्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास अधिक उत्पादन करता येईल व रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.