ETV Bharat / city

रखडलेली पाणीपुरवठा योजना, नळ जोडण्यांच्या कामांना गती द्या - गुलाबराव पाटील

author img

By

Published : Jul 14, 2021, 9:16 PM IST

नळजोडण्या व सुधारणात्मक पुनर्जोडणी आणि नवीन योजना मोठ्या प्रमाणात पूर्ण करावयाच्या आहेत. त्या दृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल गतीने तयार करावेत, प्रत्येक तालुक्यात दररोज, दर महिन्याला किती नळजोडण्या करणार, पुनर्जोडणी करणार याचे उद्दिष्ट ठरवून त्याप्रमाणे नियोजन करावे. दर महिन्याला विभागातील मुख्य अभियंत्यांनी त्याचा आढावा घ्यावा असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

minister gulabrao patil on stagnant water supply scheme
नळ जोडण्यांच्या कामांना गती द्या - गुलाबराव पाटील

मुंबई - नव्या तसेच रखडलेल्या पाणीपुरवठा योजना आणि नळ जोडण्यांच्या कामांना नियोजनबद्ध पध्दतीने गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात अमरावती व नागपूर विभागातील पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

नियोजन पध्दतीने काम करा

नळजोडण्या व सुधारणात्मक पुनर्जोडणी आणि नवीन योजना मोठ्या प्रमाणात पूर्ण करावयाच्या आहेत. त्या दृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल गतीने तयार करावेत, प्रत्येक तालुक्यात दररोज, दर महिन्याला किती नळजोडण्या करणार, पुनर्जोडणी करणार याचे उद्दिष्ट ठरवून त्याप्रमाणे नियोजन करावे. दर महिन्याला विभागातील मुख्य अभियंत्यांनी त्याचा आढावा घ्यावा असे निर्देशही त्यांनी दिले. पाणीपुरवठा योजना तसेच नळजोडण्याचे उद्दिष्ट पूर्ण करत असताना गडचिरोली जिल्ह्याने केलेल्या कामाचे कौतुक यावेळी पाणीपुरवठा मंत्र्यांनी केले व इतरांनी त्यांच्या कामांचा आदर्श घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बाह्य स्रोतांद्वारे मनुष्यबळ घ्यावे

काही जिल्ह्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. अशा जिल्ह्यांनी बाह्य स्रोतांद्वारे /कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, अमरावती व नागपूर विभागातील पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि सर्व कार्यकारी अभियंता बैठकीला उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.