ETV Bharat / city

कोकणासाठी ग्रीनफील्ड महामार्गाची राज्य सरकारची घोषणा - सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंची विधासभेत घोषणा

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना जोडण्यासाठी शिवडी-न्हावा शेव्हा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याअंतर्गत सुमारे ५०० किलोमीटर लांबीचा महामार्ग बांधण्यात येणार आहे.

कोकणासाठी ग्रीनफील्ड महामार्गाची राज्य सरकारची  घोषणा

author img

By

Published : Mar 15, 2020, 10:57 AM IST

मुंबई - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा ग्रीनफील्ड महामार्ग (Express way) बांधण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी आज विधानसभेत केली.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना जोडण्यासाठी शिवडी-न्हावा शेव्हा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याअंतर्गत सुमारे ५०० किलोमीटर लांबीचा महामार्ग बांधण्यात येणार आहे. महाराष्ट्र- गोवा सीमेवरील पात्रादेवीपासून सुरू होऊन हा रायगड जिल्ह्यातील चिर्ले गावाजपर्यंत जाणार आहे.

सदर महामार्गाची आखणी कोकणपट्टीच्या किनाऱ्याजवळून समुद्र किनाऱ्यालगतच्या पर्यटन विकासास चालना मिळेल. तसेच या महामार्गामुळे कोकणातील कृषी उद्योगासही चालना मिळेल. कोकणातील हापूस आंबा, काजू, सुपारी, नारळ इत्यांदीसाठी थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. या महामार्गामुळे उद्योग वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हे नियोजन करत असताना स्थानिकांना विश्वासात घेऊन आणि कोकणाचे सौदर्य अबाधित ठेऊन तसेच पर्यावरणाचा समतोल राखून नियोजन करण्यात येईल.

यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास (MSRDC) तांत्रिक व वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत असे मंत्री शिंदे म्हणाले.

हेही वाचा - 'गिरीश तुला बाहेर जायचे का?' विधानसभा अध्यक्षांनी दिला दम

हेही वाचा - कोरोनाचा धसका कानिफनाथ यात्रेला, यंदा प्रथमच 'या' परंपरेला छेद

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.