ETV Bharat / city

Minister Aditya Thackeray : राज्यात एईडी मशिन बंधनकारक करणार - आदित्य ठाकरे - मंत्री आदित्य ठाकरे फीट महाराष्ट्र कार्यक्रम

राज्यातील प्रत्येक कार्यालय, विमानतळ, रेल्वे स्थानक, पोलीस स्टेशन, हॉटेल्स आणि मॉलमध्ये एईडी मशीन बंधनकारक करणार आहोत, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ते गेट वे येथील कार्यक्रमात बोलत होते.

मंत्री आदित्य ठाकरे
मंत्री आदित्य ठाकरे
author img

By

Published : Apr 7, 2022, 3:32 PM IST

मुंबई - आरोग्य हा विषय जागतिक असो, वा स्थानिक पातळीवर खूप महत्त्वाचा होत चाललेला आहे. गेल्या दोन वर्षात त्याची प्रचिती आली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने हृदयरोगाचा झटका आल्यावर तातडीने उपाययोजना केल्यास मृत्यू टाळता येतो. ही बाब लक्षात घेत, राज्यातील प्रत्येक कार्यालय, विमानतळ, रेल्वे स्थानक, पोलीस स्टेशन, हॉटेल्स आणि मॉलमध्ये एईडी मशीन बंधनकारक करणार आहोत, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ते गेट वे येथील कार्यक्रमात बोलत होते.

कोरोनासारख्या महामारीनंतर आरोग्याचे महत्व कळायला लागले आहे. डॉक्टरही देव असल्याची जाणीव झाली आहे. आता हृदयविकाराचा त्रास असलेल्यांवर उपाययोजना करतानाचे प्रत्याक्षिके दाखवले. परंतु खरी परिस्थिती समोर असताना वेगळी असते. ते काम सोप्या पद्धतीने करणारे डॉक्टर असतात. हृदयरोगावर एईडी मशीनच्या माध्यमातून उपाय योजना करून जीव वाचवता येतो. त्यामुळे राज्यातील प्रत्येक कार्यालय, विमानतळ, रेल्वे स्थानक, पोलीस स्टेशन, हॉटेल्स आणि मॉलमध्ये एईडी मशीन बंधनकारक करणार आहोत. याचा निकाल सर्वत्र महाराष्ट्रात दिसून येईल, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. मैदानी खेळ किंवा अन्य कारणास्तव आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यावर तातडीने उपाययोजना करणे शक्य होईल. शिवाय, अनेक जीव वाचतील, मंत्रिमंडळात लवकरच हा विषय आणून त्याला मान्यता देऊ, असे मंत्री ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र शासनाने 'फिट महाराष्ट्र' ही मोहीम सुरू केली आहे. ही जरा वेगळी आहे. हेल्थ केअर दोन प्रकारच्या असतात. तयापैकी एक प्रायमरी हेल्थ केअर, हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिस्ट हेल्थ केअर सेंटर, एक्सरे आहेत. महाराष्ट्रात चांगले हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज कसे करता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बाईक रुग्णवाहिका ॲडव्हान्स लाइफ, बेसिक लाईफ मॅनेजमेंट वरती फोकस करतो आहे. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर आहे. हॉस्पिटलची गरज लागणारच नाही, यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना करणे गरजेचे आहे, असे मंत्री ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - आमदार रवी राणा यांची सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून चौकशी; महापालिका आयुक्तांवर शाई फेकल्याचे प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.