ETV Bharat / city

Mumbai Viewing Deck : दादर दर्शक गॅलरी नागरिकांसाठी खुली, समुद्राच्या लाटा, वरळी सी लिंकचा आनंद लुटता येणार - माता रमाबाई आंबेडकर स्मृती दर्शक गॅलरी

मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी दादर येथील दर्शक गॅलरी चे लोकर्पण केले ( Mumbai Viewing Deck ) आहे. या दर्शक गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर स्मृती दर्शक गॅलरी असे नामकरण करण्यात येणार आहे. येथुन नागरिकांना चौपाटी, समुद्राच्या लाटा, वरळी सी लिंकचा आनंद लुटता येणार आहे.

Mumbai Viewing Deck
Mumbai Viewing Deck
author img

By

Published : Feb 10, 2022, 8:03 AM IST

मुंबई - दादर परिसरातील पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी चौपाटी येथे चैत्यभूमी परिसरात जलवाहिनी आहे. चौपटीला भेट देणारे अनेक नागरिक या जलवाहिनीवर बसतात. येथे सेल्फी घेतात, फोटो काढतात. त्यामुळे याच जागी दर्शक गॅलरी ( Mumbai Viewing Deck ) उभारण्यात आली आहे. या दर्शक गॅलरीवरून ( Mumbai Viewing Deck ) चौपाटी, समुद्राच्या लाटा, वरळी सी लिंकचा आनंद लुटता येणार आहे. तसेच, चैत्यभूमीचे दर्शनही घेता येणार ( Mumbai Dadar Chaityabhumi ) आहे.

जलवाहिनीवर दर्शक गॅलरी

मुंबई महापालिकेने या जलवाहिनीवर दर्शक गॅलरी उभारण्याचा निर्णय घेतला ( Mumbai Corporation Viewing Deck ) होता. मात्र, कोरोनाचा प्रसार सुरु झाल्याने काम रखडले होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाकडे (एमसीझेडएमए) परवानगीसाठी अर्ज केला होता. या परवानग्या प्राप्त झाल्यावर निविदा काढून ४ कोटी ५९ लाख रुपये खर्च करून ही गॅलरी उभारण्यात आली.

दर्शक गॅलरी

अशी आहे दर्शक गॅलरी

१० हजार चौरस फूट असणाऱ्या गॅलरीची उंची समुद्रापासून सुमारे दहा फूट आहे. यामुळे भरतीच्या वेळीही लाटांची मजा या गॅलरीवरून घेता येणार आहे. २६ पिलर्स वर असलेल्या गॅलरीचे बांधकाम केवळ दहा महिन्यांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आले. गॅलरीवर अत्याधुनिक व ऊर्जा बचत करणाऱ्या 'एलईडी' दिव्यांची आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली. गॅलरीवर एका वेळी 300 व्यक्ती उभ्या राहू, तर 100 व्यक्ती बसू शकतात. यासाठी सदर ठिकाणी २६ बाके ठेवण्यात आली आहेत. तसेच ८ ठिकाणी वैविध्यपूर्ण आकाराची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरण पूरकतेचा भाग म्हणून याठिकाणी विविध प्रकारची १३० झाडे लावण्यात आलेली आहेत.

माता रमाईंचे नाव देण्याचे निर्देश

चैत्यभूमी जवळ हे पर्यटन स्थळ असल्याने त्याचे नामकरण 'माता रमाबाई आंबेडकर स्मृती दर्शक गॅलरी' असे ( Mata Ramabai Ambedkar Smriti Viewing Deck ) करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहे. तसेच, या स्थळाच्या धर्तीवर मुंबईतील इतर जलवाहिन्यांवर देखील 'दर्शक गॅलरी' उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहे.

हेही वाचा - Sachin Waze Wrote Letter To ED : माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनण्यास तयार, 'ईडी'ला लिहिले पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.