ETV Bharat / city

MIDC वर हॅकर्सचा डोळा? हॅकर्सने केली तब्बल ५०० कोटींची मागणी

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सर्व्हर हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसीचा सर्व्हर हॅक करणाऱ्या हॅकर्सकडून तब्बल 500 कोटींची मागणी करण्यात आल्याचं कळतंय.

author img

By

Published : Mar 30, 2021, 8:17 AM IST

Updated : Mar 30, 2021, 11:59 AM IST

MIDC
एमआयडीसी

मुंबई- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सर्व्हर हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसीचा सर्व्हर हॅक करणाऱ्या हॅकर्सकडून तब्बल 500 कोटींची मागणी करण्यात आल्याचं कळतंय. मागणी पूर्ण केली नाही, तर डेटा हॅक करण्यात आलेल्या सर्व्हरवरील सर्व महत्वाचा डाटा नष्ट करण्याची धमकीही हॅकर्सनी दिली आहे, असे सूत्रांकडून समजते.

तोडगा काढण्याचा पर्याय

हेही वाचा - ...पण बाजूच्या बांगलादेशात हवी असलेली दंगल पेटली

हॅक करणारे देशातील आहेत की परदेशातील याची अद्याप कोणतीही माहीती समोर आली नाही.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मात्र, सिस्टीम व्यवस्थित होई पर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.

हेही वाचा - राज्यात सोमवारी 31 हजार 643 कोरोनाबाधितांची नोंद

MIDCचे कामकाज ठप्प
मागील सोमवारपासून सर्व्हर हॅक झाल्यामुळे मुंबईसह १६ प्रादेशिक कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे.कामकाज बंद पडले आहे . एमआयडीसीशी संबंधित सर्व औद्योगिक वसाहती , त्यातील उद्योजक , संबंधित शासकीय घटक आणि विविध योजनांची संपूर्ण माहिती ऑनलाईन सिस्टिममुळे सर्व्हर आहे. हा ऑनलाईन डाटा सर्व्हर हॅक झाल्याने ओपन होत नव्हता.परिणामी, संगणक ओपन केल्यास व्हायरस दिसत असून सिस्टिममध्ये प्रवेश केल्यास डाटा नष्ट होण्याचा धोका आहे. अशी परिस्थिती सगळ्याच एमआयडीसी कार्यालयांमध्ये आहे.या सगळ्या प्रकारावर आयटीची टीम कार्यरत असून यावर तोडगा शोधला जात आहे. मात्र या सगळ्या प्रकारची गुप्तता पाळण्यात आली आहे.

Last Updated : Mar 30, 2021, 11:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.