ETV Bharat / city

म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत; मुंबई-ठाण्यात परवडणारी बांधणार घरे

खुल्या जागा ताब्यात घेऊन त्यावर मुंबई आणि ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घर, सदनिका उपलब्ध करण्यासाठी म्हाडाकडून तयारी करण्यात येत आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

म्हाडाची बैठक
म्हाडाची बैठक
author img

By

Published : Sep 15, 2020, 7:31 PM IST

ठाणे - मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार आहे. त्याअनुषंगाने म्हाडातर्फे मुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरे उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. म्हाडा मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करून त्याजागी परवडणाऱ्या दरात घरे उभारणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

पूर्व उपनगरातील टागोर नगर आणि कन्नमवार नगर या भागांत मोठ्या वसाहती उभ्या करण्याचा गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा प्रयत्न आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच, मुंबई उपनगरात रिकामे असलेले भूखंडही ताब्यात घेणार आहे. याबाबत माहिती देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुंबईतील खुल्या भूंडाबाबतचे वाद न्यायालयात प्रलंबित आहेत. अशा जमिनी ताब्यात घेऊन परवडणारी घरे बांधता येतील. यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घर व सदनिका उपलब्ध करून देता येतील.

गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी गृहनिर्माण खात्याची तातडीने बैठक घेतली आहे. या बैठकीला स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, अप्पर मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे, गृहनिर्माणचे प्रधान सचिव श्रीनिवास व म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.