ETV Bharat / city

बाळासाहेब ठाकरे विमा योजना: अपघातातील जखमींना सरकारकडून उपचाराची हमी

अपघातानंतर वेळीच उपचार मिळाले तर जखमींचे प्राण वाचवणे शक्य झाले असते. ही बाब विचारात घेत, ठाकरे सरकारने बाळासाहेबांच्या नावाने विमा योजना सुरू केली आहे.

संपादित
संपादित
author img

By

Published : Feb 16, 2021, 10:12 PM IST

मुंबई - राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना लागू केली आहे. या योजनेत अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला ३० हजारांपर्यंतच्या उपचारांची व आर्थिक मदतीची हमी मिळणार आहे. राज्य सरकारने याबाबतचे अध्यादेश काढले आहेत.

राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांवर झालेल्या अपघातात दरवर्षी सरासरी ४० हजार व्यक्ती जखमी तर १३ हजार व्यक्तींचा मृत्यू पावतात. अपघातानंतर वेळीच उपचार मिळाले तर जखमींचे प्राण वाचवणे शक्य झाले असते. ही बाब विचारात घेत, ठाकरे सरकारने बाळासाहेबांच्या नावाने विमा योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे रस्त्यांवर होणाऱ्या अपघातातील जखमींना लाभ मिळणार आहे. अपघातातील व्यक्ती अन्य राज्य व विदेशातील असली तरीही त्यांना योजनेंतर्गत वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत. अपघातग्रस्तांना 'गोल्डन अवर'मध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल, असे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेकरिता आर्थिक निधीची तरतूदीला मंजुरी दिल्याचे अध्यादेश काढले आहेत.

हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या महगाईचा 'भडका' थांबेना...सलग आठव्या दिवशी दरवाढ

अशी आहे योजना
- ७२ तासांसाठी जवळच्या रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
- सुमारे ७४ उपचार पध्दतीतून ३० हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत असणार आहे.
- रुग्णाला घरी अथवा इतर रुग्णालयात पोहचविण्यासाठी रुग्णवाहिका दिली जाणार आहे.
- एक हजार रुपयांपर्यंत रुग्णवाहिकाचा खर्च सरकार करणार आहे.
- अतिदक्षता विभाग, वॉर्डमधील उपचार, फॅक्चर तसेच रुग्णालयातील वास्तव्य आणि जेवणही मोफत असणार आहे.
- दैनंदिन कामातील, घरातील, औद्योगिक क्षेत्रातील व रेल्वे अपघातांचा या योजनेत समावेश नाही.
- अपघात योजनेत कोणालाही वयाची अट नसेल.

हेही वाचा- रिक्शा ड्रायव्हरची मुलगी असलेल्या मन्या सिंगचे रिक्शा रॅलीने स्वागत

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.