ETV Bharat / city

...म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट - Balasaheb Thorat

राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याचे काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानिमित्ताने काँग्रेस नेते व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस नेत्यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

author img

By

Published : Sep 23, 2021, 3:50 PM IST

Updated : Sep 23, 2021, 5:11 PM IST

मुंबई- काँग्रेस खासदार राजू सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेवर एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घातली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे.

काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराचे अर्ज भरले आहेत. त्यावेळी काँग्रेसकडून रजनी पाटील तर भारतीय जनता पक्षाकडून संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

हेही वाचा-राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी बदलावी लागणार, रजनी पाटील यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी

राजकीय परंपरेनुसार निवडणूक बिनविरोध व्हावी-

राज्यातील आमदार किंवा खासदारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर, त्या जागी निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे. त्या परंपरेनुसार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसकडून रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विरोधी पक्षाला विनंती करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी देवेंद्र फडणीस यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी विनंती केली आहे.

हेही वाचा-सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी लवकरच निवडणूक

भाजप नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष-

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज 22 सप्टेंबरला भरण्यात आला. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते, की राजीव सातव यांच्या निधनानंतर त्या जागी राजीव यांच्या पत्नीला उमेदवारी दिली असती तर, भाजपने उमेदवार दिला नसता. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केल्यानंतर भाजप नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा-राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी

दरम्यान, राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक आयोगाने यापूर्वीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीचे मतदान व मतमोजणी एकाच दिवशी (4 ऑक्टोंबर) रोजी होणार आहे.

काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकदा वाक्युद्ध झाल्याचे दिसून आले. अशा स्थितीत या नेत्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Last Updated : Sep 23, 2021, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.