मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात विविध ड्रग्ज सिंडिकेट्स समोर येत आहेत. तसेच एनसीबी या प्रकरणाशी निगडीत सर्व धागेदोरे मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. याच ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या अनुषंगाने आणखी एक महत्त्वाची कारवाई समोर आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) करमजीत याची मर्सिडिज गाडी ताब्यात घेतली आहे. या गाडीमार्फत ड्रग्जची तस्करी होत असल्याचा संशय एनसीबीला आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूशी संबंधित मादक पदार्थांच्या प्रकरणाचा तपास करणार्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने आणखी 7 जणांना अटक केली आहे. ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या पथकाने करमजीतसिंग आनंद (वय- 23) याला नुकतीच मुंबईतून अटक केली. त्याच्याकडून गांजा, चरस यासारखे मादक पदार्थ जप्त करण्यात आले. त्याचवेळी एनसीबीने करमजीतजवळील वाहन जप्त केले आहे. करमजीत हा ड्रग पेडलर आहे. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केलेला आरोपी करमजीत ऊर्फ केजे याच्याकडे मर्सिडिज् बेंझ 4 मॅटिक आहे. याची किंमत 99.90 लाख रुपये आहे.