ETV Bharat / city

गेल्या 27 वर्षांपासून रोज संध्याकाळी नौबत वाजवून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा 'मेहबूब' - गेट वे ऑफ इंडिया

मराठा साम्राज्याच्या ( Maratha Empire ) काळात सूर्यास्त झाला की राजवाड्यात नौबत वाजवला जायचा आणि त्याचबरोबर राजवाड्याचे दरवाजे बंद केले जायचे. नौबत वाजवण्याची परंपरा मराठा साम्राज्यात सुरू ( Tradition of Playing Naubat ) झाली. अशाच प्रकारे नित्यनियमाने मानवंदना देण्याचे काम गेटवे ऑफ इंडिया ( Gate Way Of India ) येथे सूर्यास्ताच्या वेळी नौबत वाजवून केले जाते. हे मानवंदना देण्याचे काम अखंडपणे करणारी व्यक्ती आहे मेहबूब इमाम हुसेन ( Mehboob Imam Hussain ) . एक कट्टर शिवप्रेमी.

Mehboob who pays homage to Chhatrapati Shivaji Maharaj
छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा 'मेहबूब'
author img

By

Published : May 7, 2022, 12:43 PM IST

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांना गेली सत्तावीस वर्ष नित्यनियमाने मानवंदना देण्याचे काम गेटवे ऑफ इंडिया ( Gate Way Of India ) येथे सूर्यास्ताच्या वेळी नौबत वाजवून केले जाते. हे मानवंदना देण्याचे काम अखंडपणे करणारी व्यक्ती आहे मेहबूब इमाम हुसेन ( Mehboob Imam Hussain ). एक कट्टर शिवप्रेमी असलेल्या मेहबूब यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हे काम करणार असल्याचे ठरवले आहे. इतकच नाही तर मेहबूब यांनी याच शिवप्रेमातून सोमवारी शिवजयंतीच्या निमित्ताने इथं येणाऱ्या पर्यटकांना जिलेबी देखील वाटली. यातूनच मेहबूब यांच्या शिवप्रेमाची प्रचिती येते. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रत्येक मावळा जीवापाड प्रेम करत होता. याला साडेतीनशे वर्ष उलटल्यानंतरही मेहबूब यांच्या रुपाने निष्ठावंत मावळा महाराजांवरील त्यांचे प्रेम व्यक्त करत आहे.

1995 पासून सुरुवात : मेहबूब मूळचे कर्नाटकचे त्यांचे आई-वडील कामानिमित्त धारवाडहून मुंबईत आले. मेहबूब यांचा जन्म मुंबईत झाला. "गेटवे ऑफ इंडिया येथे 1982 पासून नौबत वाजवली जात आहे. 1995 पर्यंत बाबुराव दीपक जाधव नौबत वाजवत. त्यानंतर त्यांना नौबत वाजवणं शक्य नसल्याने हे काम माझ्याकडे आले." असे 55 वर्षीय मेहबूब सांगतात. मेहबूब तेव्हापासून दर दिवशी सुर्यास्तावेळी गेटवे ऑफ इंडिया येथे न चुकता नौबत वाजवतात.

छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा 'मेहबूब'

शेवटच्या श्वासापर्यंत हे काम करणार : "शिवाजी महाराजांची नौबत वाजवायला मिळणे हे माझं सौभाग्य आहे. मी शिवप्रेमी आहे. समजायला लागले तेव्हापासून शिवजयंती साजरी करत आहे. मला कोणाकडून काही मिळण्याची अपेक्षा नाही. माझ्यानंतर हे नौबत कोण वाजवेल हे अल्लालाच ठाऊक आहे. मात्र, जोपर्यंत माझे शरीर साथ देईल तोपर्यंत मी नौबत वाजवणे थांबवणार नाही." असं मेहबूब म्हणतात.

महाराजांसारखा राजा दिल्लीच्या गादीवर बसावा : ईटीव्ही भारतशी बोलताना मेहबूब म्हणाले की, "हे सर्व राजकारण सुरू आहे. पण, आमच्या अनेक मुस्लीम बांधवांची देखील हीच भावना आहे. की, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिल्लीच्या गादीवर बसायला हवा. ज्याने धर्माच्या नाही तर मानवतेच्या नीतीवर राज्य केलं. महाराजांनी मुस्लिमांसाठी अनेक मशिदी देखील बांधल्या आहेत. पण, हा इतिहास बाजूला ठेवून ठराविक इतिहास सध्या आपल्यासमोर मांडला जातोय."

नौबत वादनाचा इतिहास : मराठा साम्राज्याच्या ( Maratha Empire ) काळात सूर्यास्त झाला की राजवाड्यात नौबत वाजवला जायचा आणि त्याचबरोबर राजवाड्याचे दरवाजे बंद केले जायचे. नौबत वाजवण्याची परंपरा ( Tradition of Playing Naubat ) मराठा साम्राज्यात सुरू झाली. हे नौबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. आणि दररोज संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर ते वाजवले जात असत. जेणेकरून लोकांना कळेल की गडाचे दरवाजे आता बंद झाले आहेत. मेहबूब इमाम हुसेन यांनी ही परंपरा आजही जिवंत ठेवली आहे. त्यामुळे गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घुमणारा हा नौबतचा आवाज तुम्हाला सहज भूतकाळात घेऊन जातो.

कामाचे मानधन नाही : मेहबूब यांना या कामाचे मानधन मिळत नाही. ते शिवाजी महाराजांवरील प्रेमापोटी गेली 27 वर्षे हे काम करत आहेत. उदरनिर्वाहासाठी ते कधी गेट वे ऑफ इंडिया येथे फोटोग्राफी करतात तर कधी फिरून वस्तू विकतात, किंवा फेरीबोटीतून जाणाऱ्या लोकांना आईस्क्रीम विकतात. कुलाबा नेव्ही नगर येथील गीतानगर येथे आजही ते एकावर एक मजला बांधलेल्या दहा बाय दहाच्या खोलीत कुटुंबासह राहतात. "मी गेली 27 वर्षे कोणत्याही अपेक्षेविना करत आहे. मला महाराष्ट्र शासनाकडून कोणतंही मानधन दिलं जात नाही. एखादी संस्था किंवा सरकारने स्वतःहून पुढं येऊन मला मदत जाहीर केल्यास मी ती आनंदाने स्वीकारेन." असं मेहबूब सांगतात. त्यामुळे, आता या मेहबूब इमाम यांच्यासारखं मानवतावादी बनवून 'महाराजांचा मेहबूब' व्हायचं की राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त भाषणांना बळी पडून गर्दीतला एक कार्यकर्ता याचा विचार प्रत्यकाने करणं गरजेचं आहे.

हेही वाचा : फ्रान्समध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मिळ छायाचित्र आले समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.