ETV Bharat / city

rajesh kshrisagar guahati story : सकाळी मातोश्री अन् सायंकाळी गुवाहाटीकडे; शिंदे यांचा निरोप येताच क्षीरसागर रवाना - Rajesh Kshirsagar

शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( ShivSena rebel leader Eknath Shinde ) यांना आमदारांबरोबर आता खासदारांचा सुद्धा पाठिंबा मिळत आहे. अशातच आता माजी आमदारांना सुद्धा आता गुवाहाटीला बोलविण्यात आले आहे. कोल्हापूरचे उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर ( Kolhapur Shiv Sena MLA Rajesh Kshirsarag) हे सुद्धा गुवाहाटी येथे रवाना झाले आहेत.

rajesh kshrisagar
rajesh kshrisagar
author img

By

Published : Jun 24, 2022, 9:38 AM IST

कोल्हापूर : शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( ShivSena rebel leader Eknath Shinde ) यांना आमदारांबरोबर आता खासदारांचा सुद्धा पाठिंबा मिळत आहे. अशातच आता माजी आमदारांना सुद्धा आता गुवाहाटीला बोलविण्यात आले आहे. कोल्हापूरचे उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) हे सुद्धा गुवाहाटी येथे रवाना झाले आहेत. काल सायंकाळी ते गुवाहाटीला रवाना झाले तर दुसरीकडे त्यांची मुलं मात्र मुंबईत असल्याची माहिती आहे. दरम्यान, ईटीव्ही भारतने माजी आमदारांचे काय अशा आशयाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आता क्षीरसागर गुवाहाटीला गेल्याने शिंदे माजी आमदारांना सुद्धा आता एकत्र करत असल्याचे दिसत आहे.

काय बोलले होते क्षीरसागर ? - दरम्यान, राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. त्यामुळे आज सकाळी राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण चक्रव्यूहामध्ये अडकलो असल्याचे म्हटले. एकीकडे एकनाथ शिंदे आमचे गुरू आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे आमचे दैवत असून मातोश्री आमचे मंदिर आहे. आम्हाला सगळं काही व्यवस्थित व्हावे आणि शिवसेना पूर्ण ताकदीने समोर यावी अशी आपली इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, असे काय झालं की एकनाथ शिंदे यांचा निरोप येताच ते गुवाहाटीला रवाना झाले असा सवाल आता उपस्थित होत आहे.

माजी आमदारांचे काय ? - काल ईटीव्ही भारतने एक वृत्त प्रसिद्ध केले होते. आपल्यासोबत 40 हून अधिक आमदार सोबत असून आम्ही म्हणजेच शिवसेना आहे असा दावा शिंदे करत आहेत. असे असताना एकही विद्यमान खासदार किंव्हा माजी आमदार आणि खासदार त्यांच्यासोबत आता दिसत नाहीयेत. त्यामुळे सोबत असलेले आमदार म्हणजेच शिवसेना असे बोलत असताना त्यांनी माजी आमदार-खासदार तसेच विद्यमान खासदारांना संपर्क का केला नसावा असाही सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे त्यांचा नेमका काय प्लॅन आहे हा सुद्धा सस्पेन्स कायम आहे आशा आशयाखाली बातमी दिली होती. त्यानंतर आता कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सुद्धा निरोप आला असून ते सुद्धा तातडीने गुवाहाटीला रवाना झाले आहेत. क्षीरसागर गुवाहाटीला गेल्याने शिंदे माजी आमदारांना सुद्धा आता एकत्र करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड दबाब टाकत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.