ETV Bharat / city

मोहिते पाटलांची भाजपला 'साथ' मात्र...शरद पवारांना हवेचा अचूक अंदाज...राज्यातील १० मतदारसंघात उद्या मतदान.. यासह अन्य राजकीय घडामोडींचा आढावा - matkandan

मोहिते पाटलांची भाजपला 'साथ'...शरद पवारांना हवेचा अचूक अंदाज...राज्यातील १० मतदारसंघात उद्या मतदान.. यासह अन्य राजकीय घडामोडींचा आढावा

मतकंदन
author img

By

Published : Apr 17, 2019, 10:59 AM IST

Updated : Apr 17, 2019, 4:39 PM IST

मोहिते पाटलांची भाजपला 'साथ' मात्र पक्षप्रवेश नाही..
सोलापूर - अकलूज येथे झालेल्या भाजपच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील भाजपच्या मंचावर होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांचे स्वागत केले. मात्र मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही. वाचा सविस्तर..

शरद पवारांना हवेचा अचूक अंदाज..
सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात अकलूज येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभेला सुरुवात झाली आहे. रणजीतसिंह निंबाळकर यांच्या सभेसाठी ही सभा आयोजीत करण्यात आली आहे. वाचा सविस्तर..

राज्यातील १० मतदारसंघात उद्या मतदान..
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दुसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान उद्या पार पडणार आहे. या टप्प्यामध्ये देशातील एकूण ९६ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात राज्यातील एकूण १० मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. आता या मतदारसंघातून नशीब आजमावणाऱ्या सर्व उमेदवारांचे भविष्य उद्या (गुरुवारी) ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. वाचा सविस्तर..

स्वाभिमानीच्या उपसरपंचाकडे सापडले ७५ लाख..
कोल्हापूर - जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यात संभाजीपूर ग्रामपंचायतीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उपसरपंचांकडे तब्बल ७५ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने केलेल्या कारवाईत ही बाब समोर आली आहे. बरकत गवंडी असे त्या उपसरपंचाचे नाव आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने बरकत गवंडी आणि त्यांचे भाऊ गणी गवंडी यांच्या दुकान आणि गोडाऊनवर छापा टाकला होता. यावेळी पथकाला दुकानात ही रक्कम आढळून आली. वाचा सविस्तर..

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार
नागपूर - काँग्रेसचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नाना पटोले यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल चुकीची माहिती आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. वाचा सविस्तर..

मी मागास असल्यानेच काँग्रेस मला शिव्या देते..
सोलापूर - मी मागास असल्यानेच काँग्रेस मला शिव्या देते. मागास असल्यानेच माझ्यासमोर अडचणी आणल्या जातात. ते पूर्ण मागास समाजाला शिव्या देत आहेत. दलित, शोषित, आदीवासींना चोर म्हणल्यास देश सहन करणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. वाचा सविस्तर..

सांगलीत अपक्ष उमेदवाराचा सायकलवरून प्रचार..
सांगली - मला मत द्या, त्याच बरोबर पाणी जपून वापरा, झाडे लावा, पर्यावरणाचे रक्षण करा, असा सामाजिक संदेश देत एका अपक्ष उमेदवाराने चक्क सायकलवरून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दत्ता पाटील असे या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. पाटील ५ दिवसांत सांगलीच्या वाड्या वस्त्यांवर बाराशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहेत. वाचा सविस्तर..

विजयसिंह मोहिते-पाटील भाजपच्या व्यासपीठावर
सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात अकलूज येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. या सभेच्या व्यासपीठावर विजयसिंह मोहिते-पाटील असल्याने त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. वाचा सविस्तर..

..आता शेतकऱ्यांच्या दारात मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही
सांगली - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीस नकार देऊन आता शेतकऱ्यांच्या दारात मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही, अशी घणाघाती टीका जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी भाजपवर केली आहे. तसेच निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, असे मतही पाटकर यांनी व्यक्त केले आहे. त्या सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रचारसभेत बोलत होत्या. वाचा सविस्तर..

मोदीजी दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं नव्हं - शरद पवार
अहमदनगर - नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफानी हल्लाबोल केला. ज्यांना स्वतः ला घर नाही त्यांनी दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हे डोकावून पाहू नये, अशी मार्मिक टीका शरद पवार यांनी मोदींवर केली. वाचा सविस्तर..

नितीन गडकरींची काँग्रेसवर घणाघाती टीका
जळगाव - भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसचे सरकार आले. काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटविण्याचा विश्वास दिला होता. पण काँग्रेसच्या काळात केवळ मुठभर नेते आणि त्यांच्या चेल्या-चपाट्यांचीच गरिबी दूर झाल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज भुसावळात केली. वाचा सविस्तर..

तुम्ही काय केले ते आधी आरशामध्ये बघा..
मुंबई - आघाडीच्या काळात आदर्श घोटाळा, कोळसा घोटाळा, शेण घोटाळा आणि बोफोर्स घोटाळे झाले. शरद पवार आणि राहुल गांधी आधी तुमची चौकशी होवू द्या. आधी तुम्ही आरशामध्ये बघा, तुम्ही काय केले ते, मग आम्हाला विचारा, लाज वाटते का? अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. मुंबई येथे प्रचारसभेत ते बोलत होते. वाचा सविस्तर..

माझी लढाई बारामतीकरांशी..
सोलापूर - आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात असणाऱ्यांनी सत्तेची वाटणी करून घेतली आहे. राष्ट्रवादीचा बिमोड करण्यासाठी आज सर्वजण एकत्र आलेले आहेत. माझी लढाई बारामतीकरांबरोबर असून संजय शिंदे यांना आपण मोजत नाही, असे प्रतिपादन भाजप-शिवसेना महाआघाडीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले. ते करमाळा तालुक्यातील जेऊर येथील सभेत बोलत होते. वाचा सविस्तर..

'बिटीया गिरनी चाहिए'..
सातारा - दिल्लीत बैठकीतून बाहेर पडत असताना, मला मोदींनी हाक दिली 'दादा इधर आओ..' देवीनं (देवेंद्र फडणवीस) को भी बुलाओ.. माझे आणि मोदींचे फार जवळचे संबंध आहेत. माझ्याकडे तेरा वर्ष गुजरात होते. आम्ही एकत्र काम केले आहे. हे अनेकांना माहित आहे. मोदी मला म्हणाले 'दाद बिटीया गिरणी चाहिए' हे म्हणजे काय तर शरद पवार यांची मुलगी पडली पाहिजे, हे रात्री सव्वा दोन वाजता मोदींनी बैठकी बाहेर पडताना आपल्याला सांगितले असल्याचे, वाई येथील सभेत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. वाचा सविस्तर..

लोकसभा निवडणुकीच्या काळात मद्य विक्रीत तब्बल ३० टक्क्यांनी वाढ
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अनेक व्यवसायामध्ये तेजी येते. या व्यवसायामध्ये एक व्यवसाय म्हणजे मद्य विक्री. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील मद्य विक्रीत तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मद्य विक्रीच्या वाढत्या विक्रीवर दारू विक्री विभागाचे लक्ष असून मद्य व्यापाऱ्यांना रोजच्या मद्य विक्रीचा अहवाल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. वाचा सविस्तर..

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 17, 2019, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.