मुंबई - आम्ही 'मराठा जोडो' आंदोलनाच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची तयारी करत आहोत, परंतु सरकारकडून आमची सर्व आंदोलने दडपली जात आहेत, त्यामुळे सरकारने आमचा अंत पाहू नये, सरकारची अशीच भूमिका राहिली तर, कोरोना आणि त्याचा प्रभाव कमी झाल्यास सरकारला आम्ही शांत बसू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा कडून देण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी सरकारला हा गंभीर इशारा दिला.
कोरोना संपल्यावर आम्ही सरकारला शांत बसू देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा
मराठा क्रांती मोर्चाचे प्रशांत सावंत म्हणाले की, आमची आंदोलने दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, सरकारने आमचा अंत पाहू नये. अनेक विद्यार्थ्याचे प्रवेश थांबले आहेत, त्यावर तातडीने मार्ग काढावा. अन्यथा, आम्ही सरकार विरोधात रान पेटवू असाही त्यांनी इशारा दिला. तसेच, सरकारकडून मराठा समाजाला वेगळ्या जागा राखून ठेवून नोकर भरती केले जाण्याविषयी बोलताना, तशी कायद्यात तरतूद नाही. यामुळे आम्ही ही भरती होऊ देणार नाही, असा इशारा मोर्चाच्या अभिजित पाटील यांनी दिला.