मुंबई - आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या काही मराठा आंदोलनकर्त्यांनी आझाद मैदानाबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी समजूत घालून त्यांना पुन्हा आझाद मैदानात आणले आहे.
नोकरभरती रद्द करण्यासाठी मराठा संघटना आक्रमक; आज मंत्रालयावर मोर्चा.. - मराठा आंदोलन कोल्हापूर
16:29 December 14
मराठा आंदोलकांचा आझाद मैदानाबाहेर जाण्याचा प्रयत्न
15:50 December 14
मराठा आंदोलकांच्या भेटीला आमदार नितेश राणे आझाद मैदानात दाखल
मुंबई - मराठा आंदोलकांच्या भेटीला आमदार नितेश राणे आझाद मैदानात दाखल झाले आहेत. मराठा आंदोलक आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.
12:29 December 14
मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन..
राज्यात मराठा आरक्षण लागू केल्यानंतर त्यानुसार राज्यात भरती प्रक्रिया घेण्यात आलेली होती. यामध्ये मराठा समाजातील काही तरुणांनाची एसईबीसीच्या अंतर्गत नोकर भरती करण्यात आलेली होती. मात्र ही नियुक्ती झाल्यानंतर त्या प्रकारचे परिपत्रक काढून सुद्धा कोरोना संक्रमण असल्यामुळे त्यांची नियुक्ती ही पुढे ढकलण्यात आली होती. यातच मराठा आरक्षणाचा वाद सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे यावर स्थगिती आलेली असताना सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीला संरक्षण मिळावं, यासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे मराठा समाजातील तरुणांचे आंदोलन सुरू आहे.
10:12 December 14
कोल्हापूरहून आंदोलक रवाना..
कोल्हापूरहून काही आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत. यासोबतच राज्यभरातून आंदोलक मुंबईला जाणार आहेत.
08:18 December 14
मराठा आंदोलकांना मुंबईत प्रवेशबंदी; टोलनाक्यांवर तपासणीमुळे वाहतूक कोंडी
मराठा आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच रोखून धरण्यासाठी सीमेवर मोठा पोलीस बंदेबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेट्स लावण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक वाहनाची तपासणी करुनच मुंबईत प्रवेश दिला जात आहे.
07:33 December 14
नोकरभरती रद्द करण्यासाठी मराठा संघटना आक्रमक; आज मंत्रालयावर मोर्चा..
मुंबई : नोकरभरती रद्द करण्याच्या मागणीसाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणतीही नोकर भरती प्रक्रिया राबवू नका, या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला जाग आणण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे हे आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी याबाबत रविवारी माहिती दिली.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन..
राज्याच्या विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नोकरभरतीवरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने कोणतीही नोकरभरती करू नये. तसेच सारथी संस्था पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चाचे हजारो कार्यकर्ते आज मुंबईत जाऊन प्रदर्शन करणार आहेत. कोल्हापुरातूनसुद्धा आज पहाटे 100 हून अधिक चारचाकी गाडया निघणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले.
लेखी आश्वासनाशिवाय परत येणार नाही..
आजच्या मुंबईतील मोर्चामध्ये राज्यभरातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. जोपर्यंत नोकर भरतीची स्थगिती आणि सारथी संस्था सुरू करणार असल्याबाबतचे लेखी आश्वासन राज्य सरकार मार्फत आम्हाला मिळणार नाही, तोपर्यंत मंत्रालयासमोर ठिय्या मांडणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे सचिन तोडकर यांनी स्पष्ट केलं आहे.