ETV Bharat / city

गणेश नाईकांच्या प्रवेशाने मंदा म्हात्रे नाराज, मनधरणीसाठी रवींद्र चव्हाणांना पाचारण - ravindra chavan

गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील राजकीय लढाई सर्वश्रुत आहे. अशात, गणेश नाईक भाजपात येत असल्याने नाराज झालेल्या मंदा म्हात्रेंची समजूत काढण्याची जबाबदारी आता भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर पडली आहे. एकामागोमाग एक राष्ट्रवादीला रामराम करून आलेल्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे आता नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांपुढे उभे ठाकले आहे.

manda mhatre not happy with the entry of ganesh naik in bjp
author img

By

Published : Jul 30, 2019, 2:07 PM IST

नवी मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक, त्यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक आणि यासोबतच ५७ नगरसेवकांच्या भाजप प्रवेशासाठी उद्याचा मुहूर्त ठरला आहे. मात्र, आता भाजपमधील अंतर्गत वाद सोडवण्याचा नवा पेच भाजपपुढे उभा राहिला आहे.

गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील राजकीय लढाई सर्वश्रुत आहे. अशात, गणेश नाईक भाजपात येत असल्याने नाराज झालेल्या मंदा म्हात्रेंची समजूत काढण्याची जबाबदारी आता भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर पडली आहे. एकामागोमाग एक राष्ट्रवादीला रामराम करून आलेल्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे आता नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांपुढे उभे ठाकले आहे.

उद्या ३१ जुलैला राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, नवी मुंबईचे आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक, काँग्रेसचे मुंबईतले आमदार कालिदास कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये हा प्रवेशाचा कार्यक्रम होईल. यामुळे नक्कीच काँग्रसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं 'भगदाड' पडणार आहे.

उद्या मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून नाराज मंदा म्हात्रे यांनी या कार्यक्रमात उपस्थित न राहण्याचा निर्वाळा दिला आहे. आज सकाळी 8 च्या सुमारास भाजप नेते रवींद्र चव्हाण हे स्वतः नाराज मंदा म्हात्रेंच्या घरी आले होते. जवळपास तीन तास त्यांनी मंदा म्हात्रेंशी चर्चा केली. या चर्चेत रवींद्र चव्हाण यांनी म्हात्रे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळतेय. तसेच, उद्याच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात देखील उपस्थित राहण्याची विनंती देखील त्यांनी केली. यासंदर्भात म्हात्रे या लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एकूणच काय, तर एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत. त्यामुळे नाराज मंदा म्हात्रे यांची समजूत काढण्यात भाजप यशस्वी होतो की, भाजपमधला अंतर्गत वाद उफाळून त्याचा फायदा इतर पक्षांना होतो हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:बातमीला फाईल फुटेज सोबत जोडले आहे

नवी मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक, त्यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक आणि ५७ नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त उद्याचा ठरला असला तरी आता भाजपमधील अंतर्गत वाद सोडवण्याचा नवा पेच भाजपपुढे उभा राहीलाय. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील राजकीय लढाई अनेकदा गाजली आहे. अशात गणेश नाईक भाजपात येत असल्याने नाराज झालेल्या मंदा म्हात्रेची समजूत काढण्याची जबाबदारी आता भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. एकामागोमाग एक राष्ट्रवादीला रामराम करून आलेल्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे आता नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांपुढे आहे.
Body:उद्या ३१ जुलैला राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, नवी मुंबईचे आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक, काँग्रेसचे मुंबईतले आमदार कालीदास कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये हा प्रवेशाचा कार्यक्रम होईल. यामुळे नक्कीच काँग्रसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं भगदाड पडणार आहे.

नवी मुंबई भाजपमध्ये नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त करत नाईकांवर टीका केली. मीडियाशी बोलताना त्यांची खदखद बाहेर आली. नाईक हे स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठी भाजपमध्ये येत आहेत. ही त्यांची स्टंटबाजी आहे.भाजपचे जहाज आता फुल्ल झाले आहे. त्यामुळे नाईक यांना जागा मिळणार नसल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

उद्या मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून नाराज मंदा म्हात्रे यांनी या कार्यक्रमात उपस्थित न राहण्याचा निर्वाळा घेतला. गणेश नाईक यांच्या भाजपमध्ये येण्याने नाराज झालेल्या मंदा म्हात्रेंची समजूत काढण्याची जबाबदारी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे. आज सकाळी 8 च्या सुमारास भाजप नेते रवींद्र चव्हाण हे स्वतः नाराज मंदा म्हात्रेच्या घरी आले होते. जवळपास तीन तास त्यांनी मंदा म्हात्रेंशी चर्चा केली. या चर्चेत रवींद्र चव्हाण यांनी म्हात्रे यांचे मन वळवण्याचा प्रयत्त केल्याची माहिती मिळतेय. तसंच उद्याच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात देखील उपस्थित राहण्याची विनंती देखील त्यांनी केली.तसंच यासंदर्भात म्हात्रे या लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.Conclusion:एकूणच काय तर एका म्यानमध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत. त्यामुळे नाराज मंदा म्हात्रे यांची समजूत काढण्यात भाजप यशस्वी होतो की भाजपमधला अंतर्गत वाद उफाळून त्याचा फायदा इतर पक्षाला होतो, हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.