मुंबई - मुंबईच्या मालवणी परिसरामध्ये दिराला कामावर जा सांगणाऱ्या वहिनीचा गळा दाबून हत्या ( Man strangled his Sister in law ) केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला आहे. हत्या केल्यानंतर महिलेच्या गळ्याखाली विष टाकून ही आत्महत्या दर्शवण्याचा प्रयत्न आरोपीने केला. साहिबा असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर इर्शाद आलम ( Irshad Alam ) असे हत्या करणाऱ्या आरोपी दिराचे नाव असून पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली ( accused is arrested ) आहे. या प्रकरणात मालवण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
साहिबाचा इर्शादचा मोठा भाऊ जुबेरशी विवाह झाला होता. त्या दोघांना तीन मुले आहेत. इर्शाद काहीच काम करत नसे. सतत मोबाईलवर गेम खेळत बसणे हेच तो करायचा. यावरुन वहिनी आणि दिरामध्ये सतत भांडण व्हायचे. जुबेर हा रोजंदारीवर मजुरी करायचा. त्यामुळे इर्शादने घराबाहेर पडून कामधंदा करावा आणि कुटुंबाला हातभार लावावा अशी साहिबाची इच्छा होती. यामुळे त्या दोघांची नेहमी भांडण होत असे.
हत्या करुन आत्महत्या केल्याचा बनाव -
नेहमीप्रमाणे शुक्रवारीही वहिनी आणि दिराचे भांडण झाले. यानंतर आलमने तिची हत्या करण्याचा कट रचला. प्लानप्रमाणे शनिवारी साहिबा घरात एकटी होती. ती किचनमध्ये असताना आलमने तिच्या पाठीमागे घुसून कपड्याने तिचा गळा आवळून खून केला ( Murder case ) . तिचा मृत्यू झाल्यानंतर आलमने खिशातून उंदीर मारण्याचे औषध काढून तिच्या तोंडात आणि गळ्याखाली टाकले. त्यानंतर आरोपीने मालवणी पोलीस ठाण्यात फोन करुन आपल्या वहिनीने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात कलम 302 अन्वये हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी इर्शादला मंगळवारी रात्री पोलिसांनी केले आहे.
शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे उघड -
मृतदेहाचा शविच्छेदन अहवाल मंगळवारी आला. या अहवालात महिलेच्या पोटात विष आढळले नाही. दरम्यान डॉक्टरांना तिच्या मानेवर खुणा आढळून आल्याने मृत्यूचे कारण गळा दाबून झाल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांनी इर्शाद आलमला ताब्यात घेतले आणि त्याची पुन्हा कसून चौकशी केली. चौकशीत आलमने आपणच हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर मालवणी पोलिसांनी इर्शाद विरोधात कलम 302 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
हेही वाचा - Sworn in ceremony : देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचा 1 जुलैला होणार शपथविधी, सुत्रांची माहिती