ETV Bharat / city

Dadar Railway Station Incident : काळ आला होता पण वेळ नाही; दादर रेल्वे स्थानकातील थरारक घटना - लोकल रेल्वेत चढताना घ्यावयाची काळजी

पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील दादर रेल्वे स्थानकात ( western railway dadar ) धावत्या लोकलमध्ये चढताना एक प्रवासी फलाट आणि गाडी यांच्यातील मोकळ्या जागेत ( Dadar Railway Station Incident ) पडला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या दोन होमगार्डच्या जवानाने प्रसंगावधान दाखवून त्या प्रवाशांचा जीव वाचवला. रेल्वे स्थानकांवर घडलेली संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपली गेली आहे. त्या तरुणाचा काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल. मुंबई लोकलमध्ये प्रवास करत असताना थोडी काळजी ( mumbai local train Incident ) घेतली गेली पाहिजे असे आवाहन करण्यात येत आहे.

Dadar Railway Station Incident
दर रेल्वे स्थानकातील थरारक घटना
author img

By

Published : Jan 15, 2022, 12:45 PM IST

Updated : Jan 15, 2022, 2:56 PM IST

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील दादर रेल्वे स्थानकात ( western railway dadar ) धावत्या लोकलमध्ये चढताना एक प्रवासी फलाट आणि गाडी यांच्यातील मोकळ्या जागेत ( Dadar Railway Station Incident ) पडला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या दोन होमगार्डच्या जवानाने प्रसंगावधान दाखवून त्या प्रवाशांचा जीव वाचवला. रेल्वे स्थानकांवर घडलेली संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपली गेली आहे. त्या तरुणाचा काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल. मुंबई लोकलमध्ये प्रवास करत असताना थोडी काळजी ( mumbai local train Incident ) घेतली गेली पाहिजे असे आवाहन करण्यात येत आहे.

दादर रेल्वे स्थानकातील थरारक घटना

अशी घडली घटना -

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 10.58 वाजताच्या दरम्यान पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रंमाक 1 वर विरार लोकल ट्रेन येताच एक तरुण प्रवासी ट्रेनमध्ये बसत असताना लोकल ट्रेन लगेच सुरू झाली. मात्र त्या प्रवाशांचा तोल गेला. परिणामी लोकल दरवाजला अडकून फरफटत तो तरुण प्रवासी जात होता. तेव्हा कर्तव्यावर असलेले होमगार्डचे दोन जवान गणेश कोरडे आणि दीपक साकोर्डे यांनी लोकलकडे धाव घेतली. या दोन जवानांनी लोकल खाली जात असलेल्या प्रवाश्याला मागे ओढले आणि त्याचे प्राण वाचवले. त्याला जेजे रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या दोन्ही होमगार्ड चे कौतुक करण्यात येत आहे.

घटनेचा व्हिडिओ व्हॉयरल -

ही घटना रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये टिपली गेली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वॉयरल झाला आहे. या दोन्ही होमगार्ड जवानांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गणेश कोरडे यांनी सांगितले की, प्रवाशांना सुरक्षित ठेवणे आमचे हे काम आहे. मला हे काम करत असताना समाधान वाटते. प्रवाशांना आवाहन आहे की, धावती लोकल पकडू नयेत.

हेही वाचा - Skulls Found in Biogas Wardha : बायोगॅसमधून मिळाली 12 वी कवटी; तपासासाठी विशेष पथकाची स्थापना

Last Updated : Jan 15, 2022, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.